जाहिरात

अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video

Arshad Nadeem seen with terrorist : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमनं भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video
Arshad Nadeem seen with terrorist : अर्शद नदीमच्या कामगिरीचं भारतीयांनीही कौतुक केलं होतं.
मुंबई:

Arshad Nadeem seen with terrorist : भालाफेकपटू अर्शद नदीमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. या कामगिरीबाबत त्याचं जगभरातून कौतुक होत आहे. भारतीयांनीही त्याचं मनमोकळं कौतुक केलं. सिल्व्हर मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) आईनं तर अर्शद मुलासारखा असल्याचं म्हंटलं होतं. अर्शद नदीमनं मात्र भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यासोबत नदीमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हॅरिस डारसोबत अर्शद नदीमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संयुक्त राष्ट्रानं लष्कर-ए-तोयबाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे. भारतामधील अनेक दहशतवादी कारवायांची ही संघटना सूत्रधार आहे.

डार या संघटनेच्या मिल्ली मुस्लीम लीगचा (एमएमएल) सचिव आहे. 'लष्करचा संस्थापक आणि मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदनं स्थापन केलेला हा राजकीय पक्ष आहे. मिल्ली मुस्लीम लीग ही लष्कर-ए-तोयबाचा मुखवटा म्हणून पाहिलं जातं. 

ट्रेंडिंग बातमी -  पाकिस्तान ते पॅरिस! भाला खरेदीसाठी पैसे नसलेल्या अर्शदनं गोल्ड मेडल कसं जिंकलं?
 

अर्शद नदीमसोबत दिसलेला डार लष्करची विद्यार्थी संघटना अल-मुहम्मादिया स्टुडंट्स  (एएमएस) सोबत सक्रिय होता. ही संघटना हत्यारांचं प्रशिक्षण तसंच हल्ल्याच्या रणनितीबाबत काम करते. डार भारत विरोधी वक्तव्यासाठीही ओळखला जातो. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्यासाठी ओळखला जातो. जम्मू काश्मीरमधील भारताची स्थिती ही अफगाणिस्तानमधील अमेरिकेसारखी असल्याचं मत व्यक्त केलं होतं. भारताचीही काश्मीरमध्ये तशीच अवस्था होईल, अशी आशा त्यानं व्यक्त केलं होतं. अर्शद नदीमनं या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com