Paris Paralympics: उंचीवरुन लोक चिडवायचे, मात्र नीरज चोप्रामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी; नवदीपने थेट गोल्ड मिळवलं!

लहानपणापासून नवदीपला त्याच्या उंचीवरुन चिडवलं जात होतं. शेजारचेही त्याला चिडवत असतं. त्यामुळे घराबाहेर पडणं त्याला कठीण झालं होतं. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympics) भारताने आतापर्यंत अनेक पदकं मिळवून मोठं यश मिळवलं आहे. 8 सप्टेंबर रोजी खेळांचा हा भव्य कार्यक्रम समाप्त होईल. त्याच्या एक दिवस आधी शनिवारी 7 सप्टेंबर रोजी भारताने आणखी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे. याच्यासह भारताकडे आता सात गोल्ड मेडल झाले आहेत. हा कारनामा नवदीप सिंहने मेस जॅवलिन थ्रो F41 कॅटेगरीमध्ये केला आहे. या कॅटेगरीत पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. या कॅटेगरीत कमी उंची असणारे खेळाडू भाग घेतात. नीरज चोप्रा याला पॅरिसमध्ये गोल्ड जिंकता आलं नव्हतं, मात्र त्याला प्रेरणेचा स्त्रोत मानणारा नवदीपने समाजाकडून टोमणे मिळत असताना गोल्ड मिळवून इतिहास रचला आहे. 4 फूट 4 इंच उंचीच्या हरियाणाच्या नवदीपला हे यश मिळविण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागले. 

कमी उंचीमुळे घरातून बाहेर जाणं कठीण...
24 वर्षांचा नवदीप याने तिसऱ्या प्रयत्नात 47.32 मीटरचा थ्रो केला होता. मात्र इराणचा खेळाडू सादेग बेट सहाय याने 47.64 मीटर थ्रो करीत गोल्डवर मोहोर उठवली. या कार्यक्रमानंतर पॅरालिम्पिकच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे नवदीपचा सिल्वर गोल्डमध्ये अपग्रेड झाला. यामुळे नवदीप अत्यंत खूश झाला. लहानपणापासून नवदीपला त्याच्या उंचीवरुन चिडवलं जात होतं. शेजारचेही त्याला चिडवत असतं. त्यामुळे घराबाहेर पडणं त्याला कठीण झालं होतं. 

Advertisement

Advertisement

हे ही वाचा - Video : एका ओव्हरमध्ये 39 रन! युवराज सिंहचा रेकॉर्ड तुटला, अनोळखी खेळाडूची सनसनाटी कामगिरी

वडिलांमुळे या प्रवासाला झाली सुरुवात.. नीरजने दिली प्रेरणा...
नवदीपचा जन्म 2000 साली झाला. तो दोन वर्षांचा झाल्यानंतर आपल्या मुलाची उंची खुंटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मुलावर उपचार करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र काहीच फायदा झाला नाही. वय वाढत होतं तसं गावातील मुलं त्याला चिडवत होती. अशावेळी नवदीपच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. नवदीपचे वडील ग्राम सचिव होते. याशिवाय कुस्तीपटूही होते. त्यांनी नवदीपला एथलेटिक्समध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणा दिली. यानंतर त्याच्या जीवनात सकारात्मक बदल झाला. 

Advertisement

त्याने राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धा जिंकली आणि 2012 मध्ये त्याला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर चार वर्षांनी नवदीप प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेला. येथे नवल सिंग यांनी त्याला प्रशिक्षण दिलं. नवदीप गावात कुस्तीचे प्रशिक्षण घेत होता. पण नीरजमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नवदीपने नीरज चोप्राला अंडर-20 मध्ये विश्वविक्रम करताना पाहिलं. यामुळे त्याला खूप प्रेरणा मिळाली आणि त्याने कुस्ती सोडून भालाफेक खेळायला सुरुवात केली. 


 

Topics mentioned in this article