Pat Cummins : IPL सिझन अर्धवट सोडून मायदेशी परतला पॅट कमिन्स? पत्नीच्या पोस्टनं खळबळ

Pat Cummins Leaving IPL 2025? : आयपीएल 2025 चा सिझन सध्या चांगलाच रंगात आलाय. या सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादची (SRH) कामगिरी समाधानकारक झालेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Pat Cummins Leaving IPL 2025? : आयपीएल 2025 चा सिझन सध्या चांगलाच रंगात आलाय. या सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादची (SRH) कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांनी आत्तापर्यंत सातपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत. हैदराबादची या सिझनमधील वाटचाल अडखळती सुरु असतानाच एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या फॅन्सना मोठा धक्का बसला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सची पत्नी बेकी कमिन्सनं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिनं ब्रेकचा उल्लेख केला होत. त्यानंतर कमिन्स आयपीएल सिझन सोडून मायदेशी परतणार ही चर्चा सुरु झाली. कारण लवकरच ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपची फायनल खेळायची आहे.

( नक्की वाचा : IPL 2025 : धोनीची डोकेदुखी संपणार! MI च्या जुन्या खेळाडूची CSK मध्ये एन्ट्री, सिक्सर्ससाठी आहे प्रसिद्ध )

या पोस्टवरील चर्चा सुरु असतानाच बेकीनं आणखी एक पोस्ट करत नेमकी परिस्थिती स्पष्ट केली. त्यामध्ये कमिन्स त्याची मुलगी एडीसोबत स्विमिंग पूलमध्ये आराम करताना दिसत आहे. या फोटोमुळे फॅन्सना दिलासा मिळाला. कारण कमिन्स आयपीएल सोडून गेलेला नाही. तर पुढील सामन्यापूर्वी स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी कुटुंबासोत वेळ घालवतोय, हे स्पष्ट झालं. 

( नक्की वाचा : Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा? )
 

आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्सची पुढील लढत 23 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होतोय. होम ग्राऊंडवर होणारा हा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा सनरायझर्सचा प्रयत्न असेल. 
 

Advertisement
Topics mentioned in this article