जाहिरात

Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा?

Anaya Bangar Shocking Allegations: एका भारतीय क्रिकेटपटूला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. त्याचबरोबर अनेक खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवत असत, असं अनयानं सांगितलं आहे. 

Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा?
मुंबई:

Anaya Bangar Shocking Allegations:  टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलाचं नाव आर्यन बांगर आहे. तो गेल्या वर्षीपर्यंत मुलगा होता. पण, हार्मोन समस्येमुळे त्यानं त्याचं लिंग बदललं. तो आर्यनचा अनया बनला. लिंग बदलल्यानंतर तो बऱ्याच कालावधीनंतर भारतामध्ये आला आहे. त्यानंतर त्यानं मुलगा ते मुलगी या प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. त्याचबरोबर या प्रवासात झालेल्या त्रासाचा देखील गौप्यस्फोट केला आहे. एका भारतीय क्रिकेटपटूला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. त्याचबरोबर अनेक खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवत असत, असं अनयानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'लल्लन टॉप' ला दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये अनाया बांगरनं सांगितलं की, 'क्रिकेटर मला त्यांचे घाणेरडे फोटो पाठवत. त्यांनी मला कारमध्ये येण्यास सांगत. त्यांना माझ्याबरोबर संबंध प्रस्थापित करायचे होते. काही क्रिकेटर तर मला सर्वांसमोर शिवीगाळ करत आणि फोटो मागत.'

संजय बांगरची काय होती प्रतिक्रिया?

अनयानं यावेळी त्याचे वडील संजय बांगरबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. 'मी लिंग बदलल्यानंतर क्रिकेट खेळणं थांबवलं पाहिजे. तुला आता क्रिकेटमध्ये जागा नाही' असं त्यांनी मला सांगितलं होतं, असं अनया म्हणाली.

अनया हा आर्यन असताना त्यानं संजय बांगरप्रमाणेच मुंबईच्या इस्लाम जिमखान्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर तो इंग्लंडमधील क्लबकडूनही क्रिकेट खेळलाय. त्यानं मुंबई क्रिकेटमधील यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेट खेळलं आहे.

मुलगा ते मुलगी झालेल्या अनयानं महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सना क्रिकेट खेळण्याची परवनागी द्यावी अशी मागणी केली आहे. तिची  टेस्टोस्टोरॉनची पातळी अन्य मुलींप्रमाणेच आहे. राष्ट्रीय महिला टीममध्ये खेळण्याची आपली इच्छा असल्याचं त्यानं सांगितलं. 

( नक्की वाचा : Rohit Sharma : 'त्यावेळी वाद झाला होता', सिडनी टेस्ट न खेळण्यावर रोहित शर्मानं सोडलं मौन )
 

मुलगी असल्याचं कधी लक्षात आलं?

अनयानं यावेळी तो मुलगी असल्याचं कधी लक्षात आलं याचा किस्सा देखील सांगितला. 'तो आठ नऊ वर्षांचा असताना त्याला आईचे कपडे घालायला आवडत असतं. तो आईचे कपाटातील कपडे काढून  घालत असे. त्यावेळी आपण मुलगा नसून मुलगी असल्याचं लक्षात आलं,' असं अनायानं सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: