एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य समजल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) सध्या मुंबईच्या टीममध्येही जागा नाही. विजय हजारे ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या मुंबईच्या टीममध्ये पृथ्वीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर पृथ्वीनं एक इमोशनल पोस्ट लिहली होती. पृथ्वीच्या या पोस्टला मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) उत्तर दिलं आहे.
पृथ्वी शॉ सतत शिस्त मोडतो. तो स्वत:च स्वत:चा वैरी आहे, असं मत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केलं आहे. खराब फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणामुळे त्याला टीमला अनेक मैदानात किंवा इतरत्र लपवण्याची वेळ येत असे, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पृथ्वीच्या पोस्टला MCA चं उत्तर
विजय हजारे स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या मुंबईच्या 16 सदस्यीय टीममध्ये समावेश न झाल्यानं पृथ्वी शॉनं जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई टीमचा सदस्य होता. MCA च्या अधिकाऱ्यानं त्याच्या पोस्टला उत्तर दिलंय. 'सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत आम्ही 10 फिल्डर्ससह खेळत होतो. कारण, आम्हाला पृथ्वीला लपवावं लागत होतं. त्याच्याजवळून बॉल जायचा पण, तो पकडू शकत नसे,' अशी धक्कादाय माहिती या अधिकाऱ्यानं दिली.
या अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, 'पृथ्वीला बॅटिंग करतानाही बॉलपर्यंत पोहचण्यास त्रास होत होता. फिटनेस, शिस्त आणि खराब वागणुकीबाबत प्रत्येक खेळाडूंसाठी वेगळे नियम असू शकत नाहीत. टीममधील सीनियर खेळाडू देखील त्याची तक्रार करत होते. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या वेळी पृथ्वी टीम प्रॅक्टीसलाही गैरहजर राहत असे. तो रात्रभर बाहेर राहिल्यानंतर सकाळी सहा वाजता टीमच्या हॉटेलमध्ये येत असे.'
( नक्की वाचा : विनोद कांबळीचं उदाहरण दिलं तरी पृथ्वी शॉला समजलं नाही, प्रवीण आम्रेनं सांगितला किस्सा )
या अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, पृथ्वी शॉ सध्या मैदानाच्या बाहेरच्या कारणांमुळेच चर्चेत आहे. तो स्वत:च्या गुणवत्तेला न्याय देत नाहीय. या प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टनं त्याचं काहीही भलं होणार नाही. त्याचा याच कारणांमुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या टीममधून त्याला वगळण्यात आलं होतं. तो आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही तो खराब फॉर्ममध्ये होता.
( नक्की वाचा : विनोद कांबळीची कारकिर्द सचिनसारखी बहरली का नाही? राहुल द्रविडनं सांगितलं होतं कारण, Video )
पृथ्वीनं व्यक्त केली होती निराशा
मुंबई टीममधून वगळण्यात आल्यानंतर पृथ्वी शॉनं निराशा व्यक्त केली होती. त्यानं इन्स्टा स्टोरीवर त्यानं लिहलं होतं, ' देवा मला सांग, मला आणखी काय पाहावं लागेल? 65 इनिंग, 55.7 सरासरी आणि 126 स्ट्राईक रेटनं 3399 रन (विजय हजारे स्पर्धेत) काढल्यानंतरही मी चांगला नाही. पण, माझा स्वत:वर विश्वास आहे. ती लोकं एक दिवस माझ्यावर नक्की विश्वास ठेवतील आणि मी पुनरागमन करेल. ओम साई राम