Pravin Amre Big Statement On Prithvi Shaw: आयपीएल 2025 मधील मेगा ऑक्शन नुकतंच झालं. या ऑक्शनमध्ये आपल्याला हव्या असलेल्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व टीममध्ये जोरदार चुरस रंगली. पण, यंदाच्या ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉला कुणीही खरेदी केलं नाही. पृथ्वीला एकेकाळी टीम इंडियाचं भविष्य समजलं जात होतं. कमी वयात त्याला प्रसिद्धी, पैसा आणि टीम इंडियात जागा मिळाली होती. पण हे यश त्याला टिकवता आलं नाही. पृथ्वी शॉची घसरण सर्व क्रिकेट फॅन्समध्ये चर्चेचा आणि हळहळ व्यक्त करण्याचा विषय बनला आहे.
पृथ्वी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स टीमचा खेळाडू होता. दिल्ली कॅपिटल्सचे माजी कोच प्रवीण आम्रे यांनी पृथ्वी शॉबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. पृथ्वीला कदाचित ग्लॅमर, पैसे आणि चमक-धमक हे सर्व सांभाळता आलं नाही, असं रोखठोक मत आम्रेनं व्यक्त केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनोद कांबळीनं उदाहरण
प्रवीण आम्रेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तीन वर्षांपूर्वी विनोद कांबळीचं उदाहरण देऊन पृथ्वीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतही ते पृथ्वीला समजावू शकले नाहीत. 'मी त्याला कांबळीचं उदाहरण दिलं. पण, आजच्या तरुण क्रिकेटपटूंना काही गोष्टी समजावणं खूप अवघड आहे,' असं आम्रेंनी सांगितलं.
आम्रे पुढे म्हणाले, 'पृथ्वीनं 23 वर्षांपर्यंतच जवळपास 30-40 कोटी रुपये कमावले असतील. इतक्या कमी वयात जास्त पैसे मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा फोकस हरवणे सहज शक्य आहे. तरुण खेळाडूंनी त्यांच्या पैशांचा वापर योग्य पद्धतीनं करावा, चांगले मित्र बनवावे आणि क्रिकेटला प्राधान्य द्यावं.'
( नक्की वाचा : IPL 2025 : KKR चा नवा कॅप्टन कोण? श्रेयसनंतर पुन्हा मुंबईकरच करणार नेतृत्त्व? )
पहिल्याच मॅचनंतर स्टार
पृथ्वी शॉनं 2018 साली टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच टेस्टध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर पृथ्वीची बॉर्डर -गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाली.
त्या सीरिजपूर्वी प्रॅक्टीस मॅचमध्ये पृथ्वी जखमी झाला. त्यानंतर त्याचं करियर वेगानं घसरलं. सध्या तो टीम इंडियासह त्याची देशांतर्गत क्रिकेट टीम मुंबईतून बाहेर फेकला गेला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world