Samit Dravid Selected in U19 Team India Squad: टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्यासाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी BCCIने U19 संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडलाही (Samit Dravid) संधी मिळाली आहे. संघामध्ये समित द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अंडर-19 संघामध्ये ज्युनियर द्रविडचा (Samit Dravid) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अंडर-19 संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
(नक्की वाचा: Jay Shah : जय शहांना ICC कडून किती मिळणार पगार? BCCI कडून किती मिळत होते पैसे?)
(नक्की वाचा: अनलकी क्रिकेटर : 13 वेळा एकाच घटनेची शिकार झालेल्या क्रिकेटपटूची 26 व्या वर्षीच निवृत्ती)
टीम इंडिया माजी हेड कोच आणि कॅप्टन राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याला महाराजा ट्रॉफी KSCA T20च्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या लिलावादरम्यान मैसूर वॉरियर्सने आपल्या संघामध्ये स्थान दिले. वॉरियर्सने समितला 50 हजार रुपयांमध्ये आपल्या संघामध्ये सामावून घेतले. वॉरियर्स टीमच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना म्हटले की,"त्याला आमच्या संघात सहभागी करुन घेणे चांगलेच आहे. कारण त्याने कर्नाटककडून खेळताना विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली आहे".
(नक्की वाचा: रोहित शर्माला 50 कोटींना खरेदी करणार? LSG च्या मालकांनी दिलं उत्तर)
समित हा कर्नाटक अंडर 19 टीमचाही भाग होता, ज्याने या हंगामात कूच बिहार ट्रॉफी जिंकली तसंच या वर्षाच्या सुरुवातीस तो लँकशायर संघाविरुद्ध KSCA XI कडूनही खेळला होता.