Rahul Dravid's Son Anvay Dravid: टीम इंडियाचा महान बॅटर राहुल द्रविड याच्या घरातून आणखी एक तरुण खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. राहुल द्रविडचा लहान मुलगा अन्वय द्रविडची भारतीय अंडर 19 वनडे टीममध्ये निवड झालीय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्युनियर क्रिकेट कमिटीने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या अंडर 19 टीमची घोषणा केली. या टीममध्ये ज्युनियर द्रविडची निवड झाल्याने क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा दौरा पुढील महिन्यापासून सुरू होणार असून, यामध्ये भारताची जनरेशन नेक्स्ट त्यांची ताकद दाखवतील.
श्रीलंका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि टीमची घोषणा
भारताचा हा अंडर 19 संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे मॅचेस आणि 2 मल्टी डे मॅचेसची सिरीज खेळणार आहे. हा दौरा 4 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी यशवर्धन सिंह चौहान याच्याकडे वनडे आणि मल्टी डे दोन्ही टीमचे कॅप्टनपद सोपवण्यात आले आहे, तर लक्ष्य रायचंदानी हा दोन्ही फॉरमॅटमध्ये टीमचा व्हाईस कॅप्टन असेल.
अन्वय द्रविडची वनडे टीममध्ये विकेटकीपर बॅटर म्हणून निवड करण्यात आली असून, त्याच्यासोबत रजत बघेल हा देखील विकेटकीपरचा दुसरा पर्याय असेल. तसेच मल्टी डे मॅचेससाठी मानव कृष्णा आणि आर्यन संदेश सकपाल यांना विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे.
( नक्की वाचा : 370 रुपयांची बिर्याणी वादात प्रणीत मोरेचा आणखी एक Video Viral,पाहा वैभव सूर्यवंशीला कशी दिली होती वागणूक? )
कसा आहे अन्वयचा रेकॉर्ड?
अवघ्या 17 वर्षांच्या अन्वय द्रविडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. मागच्या विनू मांकड ट्रॉफीमध्ये त्याने कर्नाटक अंडर 19 टीमचे कॅप्टनपद सांभाळले होते आणि आपल्या नेतृत्वाखाली टीमला क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवले होते. या टूर्नामेंटमध्ये अन्वयने 6 मॅचेसमध्ये एकूण 220 रन केले होते, ज्यामध्ये नाबाद 82 रन हा त्याचा हायेस्ट स्कोर होता.
त्याचबरोबर बेंगळुरू येथे झालेल्या देशांतर्गत ट्राय सिरीजमध्ये तो इंडिया अंडर 19 B टीमकडून खेळला होता, ज्यामध्ये अफगाणिस्तानच्या टीमचाही समावेश होता. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याला आधी अंडर 19 वनडे चॅलेंजर ट्रॉफीसाठी टीम C मध्ये जागा मिळाली आणि आता थेट भारतीय टीमचे तिकीट मिळाले आहे.
मोठ्या भावानंतर आता लहान भावाची एन्ट्री
द्रविड कुटुंबियांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित द्रविड यालाही 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सिरीजसाठी भारताच्या अंडर 19 टीममध्ये निवडण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने दुखापतीमुळे समितला त्या सिरीजमधून बाहेर व्हावे लागले होते. आता मोठ्या भावानंतर लहान भाऊ म्हणजेच अन्वय द्रविड भारताची जर्सी घालून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
(नक्की वाचा : FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कपचे वेळापत्रक वाचा एका क्लिकवर, नोट करा तुमच्या आवडत्या टीमच्या मॅचची वेळ )
वनडे सिरीजसाठी भारताची अंडर 19 टीम
सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (व्हाईस कॅप्टन), यशवर्धन सिंह चौहान (कॅप्टन), विनीत वीके, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (विकेटकीपर), अन्वय द्रविड़ (विकेटकीपर), अनमोलजीत सिंह, वुटकुरी यशवीर गौड़, रोहित अनिल यादव, शाविन वी, काव्या परेश पटेल, मोहित उलवा, इशान सूद.
मल्टी डे सिरीजसाठी भारताची अंडर 19 टीम
सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (व्हाईस कॅप्टन), यशवर्धन सिंह चौहान (कॅप्टन), पटेल कुश, मनल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा (विकेटकीपर), आर्यन संदेश सकपाल (विकेटकीपर), हेमचुदेशन जे, बीके किशोर, रोहित अनिल यादव, काव्या परेश पटेल, प्रियांशु सिंह, प्रणव राघवेंद्र, चिगुरुपति वेंकट.
भारत विरुद्ध श्रीलंका अंडर 19 वनडे सिरीजचे वेळापत्रक
पहिली वनडे मॅच - 04 जुलै, हम्बनटोटा
दुसरी वनडे मॅच - 06 जुलै, हम्बनटोटा
तिसरी वनडे मॅच - 09 जुलै, हम्बनटोटा
भारत विरुद्ध श्रीलंका अंडर 19 मल्टी डे सिरीजचे वेळापत्रक
पहिली मॅच - 13 ते 16 जुलै, गाले
दुसरी मॅच - 20 ते 23 जुलै, कोलंबो