Ranji Trophy 2025: विदर्भाच्या वाघांचा रणजी ट्रॉफीवर कब्जा! एकही सामना न गमावता बनले चॅम्पियन

Ranji Trophy 2025: विदर्भाने तब्बल 7 वर्षांनी ही रणजी ट्रॉफी जिंकली असून संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी एकही सामना न गमावता हे ऐतिहासिक यश संपादन केले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Ranji Trophy Final 2025: रणजी ट्रॉफी 2024-25 चा अंतिम सामना आज नागपूरमध्ये पार पडला. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विदर्भाच्या वाघांनी केरळच्या संघाचा पराभव करत रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. विदर्भाने तब्बल 7 वर्षांनी ही रणजी ट्रॉफी जिंकली असून संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी एकही सामना न गमावता हे ऐतिहासिक यश संपादन केले. 

सामन्यामध्ये केरळच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने 379 धावा केल्या. त्यानंतर विदर्भ संघाकडून युवा फलंदाज दानिश मालेवारने 153 धावा, करुण नायरने 86 धावांची खेळी केली. या खेळीच्याच जोरावर विदर्भाने 379 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीमुळे विदर्भ संघाचा विजय झाला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसऱ्या डावामध्ये केरळचा संघ 342 धावांवर बाद झाला. केरळकडून फलंदाजी करताना सचिन बेबीने 98 धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. तर आदित्य सरवटेने 79 धावा केल्या. यासह विदर्भ संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. 

विदर्भाकडून दुसऱ्या डावात करुण नायरने शतक झळकावले आणि 135 धावांची खेळी केली. दरम्यान, दर्शन नालखंडे यांनी नाबाद 51 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने दुसऱ्या डावात नऊ बाद 375 धावा केल्या होत्या. नालकांडेने अर्धशतक झळकावताच सामना संपल्याचे घोषित करण्यात आले.

Advertisement

नक्की वाचा - Shocking Video : थोपाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ

विदर्भाने यापूर्वी 2017-18 आणि 2018-19 मध्ये विजेतेपद पटकावले होते. गेल्या काही वर्षांत विदर्भाचे हे तिसरे जेतेपद आहे. विदर्भाने पहिल्या डावात दानिश मालेवारच्या 153 धावा आणि करुण नायरच्या 86 धावांच्या मदतीने 379 धावा केल्या, परंतु कर्णधार सचिन बेबीच्या 98 धावा असूनही केरळ संघाने पहिल्या डावात 342 धावा केल्या. अशाप्रकारे विदर्भाने पहिल्या डावात 37 धावांची आघाडी मिळवली.