Video:मैदानात फक्त रवींद्र जडेजाचीच हवा! धोनीचा रेकॉर्ड मोडताच तलवारीसारखी बॅट फिरवली, सर्व खेळाडू बघतच राहिले

Ravindra Jadeja Batting Viral Video : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आणि महेंद्रसिंग धोनीचा षटकारांचा मोठा विक्रम मोडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ravindra Jadeja Batting Celebration Video
मुंबई:

Ravindra Jadeja Batting Viral Video : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आणि महेंद्रसिंग धोनीचा षटकारांचा मोठा विक्रम मोडला. तसच दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या इनिंगमध्ये जडेजाने एक चमकदार कामगिरीही केली आहे. वेस्टइंडिज विरोधात फलंदाजी करून जडेजाने चार षटकार ठोकले. याचदरम्यान जडेजाने धोनीच्या 78 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकलं.आता कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाच्या नावावर 79 हून अधिक षटकारांची नोंद झाली आहे. 

भारतीय फलंदाजांबाबत बोलायचं झालं तर,जडेजाच्या पुढे फक्त वीरेंद्र सेहवाग (91),ऋषभ पंत (90) आणि रोहित शर्मा (88) आहे. जडेजाने मागील 9 कसोटी सामन्यांमध्ये सातव्यांदा 50 हून अधिक धावांची खेळी केली आहे. तसच जागतिक क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने 176 इनिंगमध्ये 107 सिक्सर मारले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज एडम गिलख्रिस्टने 137 इनिंगमध्ये 100 षटकार ठोकून इतिहास रचला आहे.

रवींद्र जडेजाचा मैदानातील सेलिब्रेशनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

टीम इंडियासाठी मिडल ऑर्डरमध्ये धावांचा पाऊस पाडणारा अष्टपैलू खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजा फिरकीच्या जादूनेही प्रतिस्पर्धी संघाच्या भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करतो. पण जेव्हा तो मैदानात फलंदाजी करतो, तेव्हा विरोधी गोलंदाजांचा धुव्वाही उडवतो. वेस्टइंडिज विरोधात सुरु असलेल्या सामन्यातही जडेजाने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आणि मैदानात जबरदस्त सेलिब्रेशन केलं. हातात असलेली बॅट तलवारीसारखी फिरवून जडेजा मैदानात अनोखं सेलिब्रेशन करतो. आजही जडेजाने धावांचा पाऊस पाडल्यावर मैदानात मोठं सेलिब्रेशन केलं. जडेजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

भारताने वेस्टइंडिजला 162 धावांवर गुंडाळलं

भारताच्या गोलंदाजांनी वेस्टइंडिज विरोधात भेदक मारा केला आणि त्यांचा संपूर्ण संघ 162 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने वेस्टइंडिजचा फलंदाज जॉन कॅम्प्बेल, जस्टीन ग्रिव्स आणि लेनीला बाद करून तीन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली.कुलदीप यादवने 2, तर वॉशिंग्टन सुंदरला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. 

Advertisement