IPL 2026: RCB 'फायनली' तयार, विजेतेपदापासून एक पाऊल दूर, वाचा कॅप्टनच्या खेळीनं कसं बदललं टीमचं भविष्य!

IPL 2026, RCB vs GT, Qualifier 1 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून आता फक्त एक पाऊल दूर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2026, RCB vs GT, Qualifier 1 : आरसीबी सलग दुसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
मुंबई:

IPL 2026, RCB vs GT, Qualifier 1 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून आता फक्त एक पाऊल दूर आहे. धरमशालामध्ये मंगळवारी झालेल्या क्वालिफायर वनमध्ये आरसीबीनं गुजरात टायटन्सचा 92 रन्सनं दणदणीत पराभव केला. या विजयासह आरसीबीनं या सिझनच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. गुजरात टायटन्सचं मात्र या पराभवानंतरही स्पर्धेतील आव्हान कायम आहे. आता गुजरातची लढत क्वालिफायर दोन मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील विजेत्याशी होईल.

रजत पाटीदारचा महारेकॉर्ड


आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार यानं गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर 1 मॅचमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. धरमशालाच्या मैदानावर रजतच्या झंझावातापुढं गुजरातचे बॉलर पूर्णपणे हतबल झाले. अवघ्या 33 बॉल्समध्ये त्यानं नॉट आऊट 93 रन्सची वादळी खेळी केली. या खेळीच्या जोरावर आरसीबीनं गुजरातचा पराभव करत आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2026 : ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला! 'या' 5 खेळाडूंची CSK करणार हकालपट्टी? )
 

पाटीदारची रेकॉर्डब्रेक बॅटिंग आणि आरसीबीचा विजय

या महत्त्वाच्या मॅचमध्ये रजत पाटीदारनं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यानं आपल्या खेळीत 5 फोर आणि तब्बल 9 सिक्सर्स लगावले. त्याच्या या फटकेबाजीमुळे आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 254 रन्सचा डोंगर उभा केला. या डोंगराएवढ्या स्कोरचा पाठलाग करताना गुजरातची दमछाक झाली आणि आरसीबीचा विजय सोपा झाला.

कॅप्टन म्हणून रचला इतिहास

आयपीएल प्लेऑफच्या इतिहासामध्ये कॅप्टन म्हणून सर्वात मोठा स्कोर बनवण्याचा मान आता संयुक्तपणे रजत पाटीदारकडे गेला आहे. त्यानं या मॅचमध्ये नॉट आऊट 93 रन्स करून डेव्हिड वॉर्नरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. वॉर्नरनं देखील 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध नॉट आऊट 93 रन्स केले होते. विशेष म्हणजे, रजत पाटीदार आणि डेव्हिड वॉर्नरशिवाय प्लेऑफमध्ये आतापर्यंत कोणत्याही कॅप्टनला 90 रन्सचा आकडा पार करता आला नव्हता, जो पराक्रम आता राजतनं करून दाखवला आहे.

सिक्सर किंग पाटीदारचा धमाका

प्लेऑफच्या एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्सर्सच्या मारणाऱ्या बॅटर्सच्या लिस्टमध्ये रजत आता दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. त्यानं गुजरातविरुद्ध 9 सिक्सर्स ठोकले. या लिस्टमध्ये शुभमन गिल 10 सिक्ससह पहिल्या नंबरवर आहे. पाटीदारनं अवघ्या 6 इनिंग्समध्ये प्लेऑफमध्ये एकूण 24 सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत सुरेश रैना (40 छक्के) आणि एमएस धोनी (28 सिक्स) यांच्यानंतर आता रजतचं नाव आदराने घेतलं जात आहे.

केवळ 21 बॉल्समध्ये फिफ्टी

रजत पाटीदारनं केवळ बॅटिंगच केली नाही, तर प्लेऑफमधील चौथ्या सर्वात वेगवान फिफ्टीची नोंद देखील केली. त्यानं केवळ 21 बॉल्समध्ये आपले 50 रन्स पूर्ण केले. याआधी सुरेश रैनानं 16 बॉल्समध्ये आणि एडम गिलक्रिस्टनं 17 बॉल्समध्ये अशी कामगिरी केली होती. आता या यादीत पाटीदारचं नाव मोठ्या अभिमानानं जोडलं गेलं आहे.

Advertisement
Topics mentioned in this article