CSK IPL 2026: आयपीएल 2026 मधून चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले आहे आहे. दरवेळेप्रमाणे यंदाही फॅन्सना काही बड्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र मैदानात या खेळाडूंनी सपशेल निराशा केली. या खराब कामगिरीनंतर आता आगामी सीझनपूर्वी चेन्नईची टीम काही बड्या नावांना नारळ देण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये 14 कोटी रुपयांचा स्टार खेळाडूही रडारवर आहे.
14 कोटींचा प्रशांत वीर ठरला फ्लॉप
उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील तरुण ऑलराउंडर प्रशांत वीर याच्यावर चेन्नईने आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये 14.20 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली होती. मात्र, मैदानात उतरल्यानंतर तो आपल्या किमतीला न्याय देऊ शकला नाही. प्रशांत या सीझनमध्ये 6 सामने खेळला, त्यामधील 5 इनिंगमध्ये तो केवळ 91 रनच बनवू शकला. इतकेच नाही, तर त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे इतकी मोठी रक्कम खर्च करूनही पदरी निराशा पडल्याने चेन्नई आता त्याच्या नावावर नक्कीच फेरविचार करेल.
( नक्की वाचा : Virat Kohli : 'त्या' जागी मी एक सेकंदही थांबणार नाही; 2027 वर्ल्ड कपच्या आधीच विराट कोहलीचा स्पष्ट मेसेज )
खलील अहमद आणि मुकेश चौधरीची सुमार कामगिरी
चेन्नईला खलील अहमदकडून खूप आशा होत्या, मात्र तो ही अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. दुसरीकडे, पहिल्या सीझनमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची मने जिंकणाऱ्या मुकेश चौधरीची जादूही ओसरलेली दिसली. मुकेशने 8 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या, मात्र पूर्ण सीझनमध्ये प्रतिस्पर्धी बॅटर्सनी त्याची जोरदार धुलाई केली. अवघ्या 30 लाख रुपयांना संघात असलेल्या मुकेशला आता पुढच्या वेळी डच्चू मिळू शकतो.
डेवाल्ड ब्रेविसची बॅट शांतच
'बेबी एबी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसची बॅट यंदा पूर्णपणे शांत राहिली. चेन्नईने त्याच्यावर 2.2 कोटी रुपये खर्च केले होते, मात्र 11 सामन्यांतील 8 इनिंगमध्ये तो केवळ 151 रन बनवू शकला. विशेष म्हणजे, यंदाच्या संपूर्ण सीझनमध्ये त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक पाहायला मिळाले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे चेन्नईच्या मीडल ऑर्डरमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आणि आता त्याच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
( नक्की वाचा : Team India : रोहित-हार्दिकचा समावेश, पण खेळण्यावर मोठी अट; अफगाणिस्तानविरुद्धच्या टीममध्ये मोठा 'ट्विस्ट' )
शिवम दुबेची कामगिरी खालावली
चेन्नईचा हुकमी एक्का मानला जाणारा शिवम दुबे यंदा फ्लॉप ठरला. त्याच्याकडून मॅच फिनिश करण्याची जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. शिवमच्या स्ट्राईक रेटमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याने या सीझनमध्ये 13 सामन्यांतील 12 इनिंगमध्ये केवळ 270 रन केले. त्याच्या सध्याच्या अनुभवाच्या तसंच दर्जाच्या मानाने हे रन्स कमी आहेत. 12 कोटी रुपये मानधन घेणाऱ्या दुबेची ही कामगिरी पाहता, चेन्नई मॅनेजमेंट त्याच्या भविष्याबाबत कठोर निर्णय घेऊ शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world