Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video

Chinnaswamy Stadium Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते देखील खूप भयानक आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Chinnaswamy Stadium Stampede : चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तसंच स्टेडियमच्या बाहेर खूप गर्दी होती
मुंबई:

Chinnaswamy Stadium Stampede: बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Royal Challengers Bengaluru)  फॅन्स मोठ्या संख्येने जमले होते. हे फॅन्स त्यांच्या लाडक्या टीमच्या पहिल्या विजेतेपदाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी येथे जमले होते. पण, या जल्लोषाला गालबोट लागलं. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते देखील खूप भयानक आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पोलिसांनी लाठीचार्ज केला का?

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तसंच स्टेडियमच्या बाहेर खूप गर्दी होती आणि कर्नाटक पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असे सांगितले जात आहे. यावेळी सर्व फॅन्स फक्त आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते.

स्टेडियमबाहेर अनेक फॅन्स बेशुद्धही पडले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. बेशुद्ध पडलेल्या चाहत्यांना रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी लोक एकमेकांना मदत करताना दिसले.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल 2025 मधील विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर एक लहान मूल बेशुद्ध पडले.

Advertisement

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील कारवर फॅन्स चढले होते. त्यामध्ये कारचे नुकसान झाले. फॅन्स एकावर एक चढून स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.

मोठ्या संख्येने फॅन्स त्यांच्या चॅम्पियन टीमची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जमले होते.