Rishabh Pant : '.... तर ऋषभ पंतचा जीवही जाऊ शकतो!', पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गंभीर इशारा

Rishabh Pant: टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंतला त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rishabh Pant : ऋषभ पंत सध्या चांगल्याच फॉर्मात आहे.
मुंबई:

Rishabh Pant: टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंत सध्या चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्यानं दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली. हा पराक्रम करणारा तो टेस्ट विश्वातील दुसराच बॅटर आहे. पंतची क्रिकेटमधीलच नाही तर एकप्रकारे आयुष्यातीलही ही दुसरी इनिंग आहे. 

ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर तो पुन्हा क्रिकेट खेळू शकेल का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अगदी त्याच्यावर उपचार करणाऱ्या मुंबईतील डॉक्टरांनाही ही काळजी सतावत होती. पण, त्यावेळी हे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी पंतवर उपचार केले. पारदीवाला आणि टीमनं केलेल्या उपचारामुळे पंतचं आयुष्य आणि क्रिकेट पुन्हा सुरळीत सुरु झाले. आता डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी पंतबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे, जे चर्चेचा विषय बनले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

तसं पुन्हा करु नको....

डॉ. पारदीवाला यांनी सांगितलं की, ' ऋषभ पंत सेंच्युरीनंतर 'सोमरसॉल्ट' मारून (उडी मारून) तो आनंद साजरा करतो. नुकत्याच झालेल्या लीड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये पंतनं सेंच्युरीनंतर तसं सेलिब्रेशन केलं होतं. इतकंच नाही तर दुसऱ्या इनिंगमध्येही पंतनं सेंच्युरी केली त्यावेळी सुनील गावसकरांनी त्याला तसे करण्यास सांगितले. त्यावेळी पंतने नकार दिला होता.

तच्या डॉक्टरांनी त्याला असे न करण्याचा सल्ला दिला आहे.  डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी सांगितले की, "पंत एक प्रशिक्षित जिम्नॅस्ट आहे तो चपळ आणि लवचिक आहे. पंतने जिम्नॅस्ट म्हणून प्रशिक्षण घेतले आहे तरीही हे पलटी मारून केलेले सेलिब्रेशन 'अनावश्यक' असून ते त्याच्यासाठी अत्यंक धोकादायक आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IND vs ENG : पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात बदल, 'या' खेळाडूची हकालपट्टी )
 

पंतनं काय सांगितलं होतं?

यापूर्वी सोनी स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत पंतने त्याच्या नवीन सेलिब्रेशनमागील कारण सांगितले होते. पंतनं सांगितलं की,  त्याने शाळेत असताना जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेतले होते आणि तो लहानपणापासूनच या प्रकारच्या कसरती करत आहे. 

पंतने त्याच्या सेलिब्रेशनबद्दल म्हटले होते की, “माझ्या मनात सेलिब्रेशनचे तीन मार्ग होते.. एक होता 'बॅटने बोलू द्या.' पण मग मी विचार केला, चला मी माझ्या स्वतःच्या शैलीत खेळतो. मी लहानपणापासूनच  या प्रकारच्या कसरती करत आलो आहे. मी शाळेत असताना जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेतले होते."

Advertisement

30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून आपल्या गावी रुरकीला जात असताना पंतचे कारवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे कार दुभाजकाला धडकली आणि त्याला गंभीर दुखापती झाल्या. पारदीवाला यांनी डेली टेलिग्राफला सांगितले, 'ऋषभ पंत खूप नशीबवान होता की तो जिवंत वाचला. तो खरोखरच खूप नशीबवान होता.' असं डॉक्टर म्हणाले.
 

Topics mentioned in this article