Video : '....तर घरी बसवला असता' सू्र्याच्या ऐतिहासिक कॅचवर रोहितचा सिक्सर

सूर्यकुमार यादवनं तो कॅच घेतला नसता तर काय केलं असतं याचं उत्तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या खास शैलीत दिलंय. 

Advertisement
Read Time: 2 mins
R
मुंबई:

टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकवण्यात सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) शेवटच्या ओव्हरमधील घेतलेल्या कॅचचा मोठा वाटा होता. सूर्यकुमारनं शेवटच्या ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरचा अशक्य कॅच पकडला. त्या कॅचनंतर मॅच भारताकडं झुकली. तब्बल 17 वर्षांनी भारतीय क्रिकेट टीमनं टी20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावलं. या कॅचबद्दल सूर्यकुमार यादवंचं सगळीकडं कौतुक होत आहे. सूर्यकुमार यादवनं तो कॅच घेतला नसता तर काय केलं असतं याचं उत्तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या खास शैलीत दिलंय. 

T20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावणाऱ्या टीममधील मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल या खेळाडूंसह टीम इंडियाचा बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना रोहितनं त्याच्या खास शैलीत टोलेबाजी केली.

काय म्हणाला रोहित?

रोहितनं सुरुवातीला मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांचे या सत्कार कार्यक्रमासाठी आभार मानले. 'मुंबईमध्ये काल जे काही पाहिलं ते स्वप्नवत होतं. वर्ल्ड कप जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 साली ती संधी थोडक्यात हुकली. हे मी, सूर्या किंवा दुबे यांच्यामुळे झालं नाही. तर सर्वांमुळे शक्य झालं. सर्व सहकारी माझ्यासोबत होते. त्यांनी प्रयत्न केल्यानंच हे होऊ शकलं. प्रत्येक मॅचचा हिरो वेगळा होता.' असं सांगत रोहितनं या विजेतेपदाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं.

( नक्की वाचा : PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? )

रोहितनं या भाषणाच्या शेवटी 'सूर्याच्या हातात कॅच बसला नाहीतर त्या मी पुढं घरी बसवलं असतं,' असं मस्करीत सांगितलं. त्यावेळी संपूर्ण विधिमंडळ हास्यकल्लोळात बुडून गेलं. 

Advertisement
Topics mentioned in this article