Rohit Sharma on Sydney Test : टीम इंडियाची 2025 मध्ये सुरुवात निराशाजनक झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली टेस्ट टीम इंडियानं गमावली. त्यामुळे भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावावी लागली. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचं आपलं स्वप्न देखील भंग झालं. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं सिडनी टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. सिडनी टेस्टपूर्वी पडद्यामागे काय घडलं? या विषयावर रोहितनं पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कशी (Michael Clarke) एका पॉडकास्टमध्ये बोलताना रोहितनं सिडनी टेस्टबद्दल मत व्यक्त केलं आहे. मी सिडनी टेस्टमध्ये खेळावं की नाही याबाबत मी हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्याशी चर्चा केली होती. त्या दोघांची प्रतिक्रिया परस्परविरोधी होती. या निर्णयाचा स्वीकार करणे आणि स्वीकार न करणे,' अशी त्यांची भूमिका होती, असं रोहितनं सांगितलं.
रोहित शर्माची 2024-25 च्या सिझनमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. त्यानं 15 मॅचमध्ये 10.83 च्या सरासरीनं 164 रन काढले. रोहित बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सीरिजमध्येही खराब फॉर्मात होता.
( नक्की वाचा : IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय? भर मॅचमध्ये 'सूर्या'चा पारा चढला, कोचला घ्यावी लागली धाव! )
रोहितनं काय सांगितलं?
रोहितनं या पॉडकास्टमध्ये सांगितलं, 'सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या टेस्टपूर्वी मला स्वत:शी प्रामाणिक राहायचं होतं. मी बॉल चांगल्या पद्धतीनं हिट करु शकत नव्हतं. मला स्वत:ला टीममध्ये ठेवायचं नव्हतं. गिलनं खेळावं अशी आमची इच्छा होती. तो खूर चांगला खेळाडू आहे. तो यापूर्वीची टेस्ट खेळू शकत नव्हता. मी चांगलं खेळत नसल्यानं हेच योग्य आहे. 10 किंवा पाच दिवसांनी ही परिस्थिती बदलेल असा मी विचार केला, असं रोहितनं सांगितलं.
रोहितनं सांगितलं, 'मी कोच आणि निवड समितीच्या अध्यक्षांशी चर्चा केली. ते त्यावेळी तिथं उपस्थित होते. ते हा निर्णय मान्य करत होते आणि मान्य करतही नव्हते. या विषयावर वाद सुरु होता. मला टीम पहिल्यांदा हे धोरण पुढं न्यायचं होतं. त्यानुसार निर्णय घ्यायचा होता. अनेकदा या गोष्टी क्लिक होतात. कधी होत नाहीत. तुम्ही जे निर्णय घेता ते प्रत्येक वेळी योग्य ठरतील याची कोणतीही खात्री नसते.'
'मी राष्ट्रीय टीमचं नेतृत्त्व करण्यास सुरुवात केली त्यावेळी फक्त मीच नाही तर अन्य खेळाडूंनी या पद्धतीनं विचार करावा अशी माझी इच्छा होती. सर्वांनी टीमला प्राधान्य द्यावं. टीमला जे आवश्यक आहे ते करावं. आपल्या रन्सचा आणि अन्य गोष्टींचा विचार करु नये. तुम्ही टीमसाठी खेळत असल्यानं हे महत्त्वाचं आहे,' असं रोहितनं सांगितलं.