जाहिरात

IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय? भर मॅचमध्ये 'सूर्या'चा पारा चढला, कोचला घ्यावी लागली धाव!

IPL 2025, Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या निर्णयावर फॅन्सनं प्रतिक्रिया देण्यापूर्वीच मुंबईचा सिनिअर खेळाडू सुर्यकुमार यादवची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.

IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय? भर मॅचमध्ये 'सूर्या'चा पारा चढला, कोचला घ्यावी लागली धाव!
मुंबई:

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) हा शुक्रवारी झालेला सामना चांगलाच रंगतदार झाला. या मॅचध्ये लखनौनं मुंबईचा 12 रन्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील तिसरा पराभव आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या निर्णयावर फॅन्सनं प्रतिक्रिया देण्यापूर्वीच मुंबईचा सिनिअर खेळाडू सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुर्यकुमार यादव नाराज का?

मुंबई इंडियन्सच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमध्ये मुंबईनं त्यांच्या इम्पॅक्ट प्लेयर तिलक वर्माला (Tilak Varma) रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी तिलकनं 23 बॉलमध्ये 25 रन काढले होते. तिलकच्या जागेवर आयपीएलमध्ये 106 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणाऱ्या मिचेल सँटनरला (Mitchell Santner) बॅटिंगला पाठवण्यात आले. 

( नक्की वाचा : Rohit Sharma : सचिन तेंडुलकरनं घेतली रोहित शर्माची गळाभेट, फॅन्सनं सांगितला अर्थ )
 

टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन असलेल्या सुर्यकुमार यादवला हा निर्णय आवडला नाही. त्याची नाराजी स्पष्ट दिली. मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धनेनं (Mahela Jayawardene) तातडीनं सूर्याकडं धाव घेतली आणि त्याला हा निर्णय समजावून सांगितला. 

तिलका रिटायर करण्याचा निर्णय त्रासदायक होता. पण, त्याला फटकेबाजी करणे अवघड जात असल्यानं हा निर्णय घ्यावा लागला, असं जयवर्धनेनं सांगितलं. तिलकनं आमच्यासाठी चांगली बॅटिंग केली. पण, सूर्या आऊट झाल्यानंतर त्यांची भागिदारी तुटली. त्यानंतर आमच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत.

मी काही ओव्हर वाट पाहिली. त्याला (तिलक वर्मा) मैदानात काही काळ घालवल्यानंतर फटकेबाजी करता येईल, असं वाटलं. पण, तो फटकेबाजी करण्यास असमर्थ ठरत असल्यानं मला कुणीतरी फ्रेश खेळाडू पाठवण्याची गरज वाटली, असं जयवर्धनेनं सांगितलं.  

मुंबई इंडियन्सला मॅच जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये 24 रनची गरज होती. त्यावेळी टीम मॅनेजमेंटनं तिलकला रिटायर केलं. पण, त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही. मुंबई इंडियन्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 191 रन केले. त्यांचा 12 रननं पराभव झाला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: