मुंबईच्या रस्त्यावर दिसलं रोहित-विराटचं स्पेशल नातं, फॅन्स भावुक! Video

Team India Victory Parade : भारतीय क्रिकेट टीमच्या विजयी मिरवणुकीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli ) यांच्यातील स्पेशल बॉन्ड दिसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Team India Victory Parade
मुंबई:

Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट टीमचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विमानतळ ते वानखेडे स्टेडियमपर्यंतचे सर्व रस्ते क्रिकेट फॅन्सनी फुलून गेले होते. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान विश्वविजेत्या टीमची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लाखो मुंबईकर सहभागी झाले होते. ओपन बसमध्ये निघालेल्या या मिरवणुकीत टीम इंडियाचे सर्व खेळाडू तसंच हेड कोच राहुल द्रविड यांनी क्रिकेट फॅन्सचं प्रेम जवळून अनुभवलं.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतीय क्रिकेट टीमच्या या मिरवणुकीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli ) यांच्यातील स्पेशल बॉन्ड दिसला. विजयी मिरवणुकीच्या दरम्यान विराट आणि रोहित यांनी पुढं येऊन वर्ल्ड कप ट्रॉफी एकत्र उंचावली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लाखो फॅन्ससाठी हा अत्यंत भावुक प्रसंग होता. सर्व फॅन्सनी जल्लोष करत हा प्रसंग सेलिब्रेट केला. 

दक्षिण मुंबईत गुरुवारी संध्याकाळी क्रिकेट फॅन्सचा सागर लोटला होता. प्रत्येकाची पावलं मरिन ड्राईव्हवर होणाऱ्या विजयी मिरवणुकीकडं निघाली होती. मध्य रेल्वेचे छत्रपती महाराज टर्मिनस (CSMT) तसंच  पश्चिम रेल्वेचं चर्चगेट स्टेशनवर येणाऱ्या सर्व लोकल्समध्ये क्रिकेट फॅन्सची गर्दी होती. शहरातल्या वेगवेगळ्या भागातून क्रिकेट फॅन्स दक्षिण मुंबईत एकत्र आले होते. त्या सर्वांनाच या ऐतिहासिक अनुभवाचा प्रत्यक्ष साक्षीदार व्हायचं होतं.

Advertisement

( नक्की वाचा : PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? )
 

'भारत माता की जय' 'वंदे मातरम' 'इंडिया, इंडिया' हा जयघोष क्रिकेट फॅन्सकडून सुरु होता. अनेक जण तिरंगा ध्वज अभिमानानं उंचावत होती. टीम इंडियाची ब्लू जर्सी घालून बरेच फॅन्स या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

भारतानं बार्बाडोसमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 रननं पराभव केला. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं एकही सामना गमावला नाही. 2007 नंतर 17 वर्षांनी भारतीय क्रिकेट टीमनं टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 2013 नंतर पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. त्यामुळे हे विजेतेपद आणखी खास आहे. विश्वविजेत्या टीमचा मुंुबईतील वानखेडे स्टेडियमवर सत्कार केला. 
 

Topics mentioned in this article