मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निवृत्त होऊन आता 11 झाली आहेत. त्यानंतरही त्याची लोकप्रियता तसूरभरही कमी झालेली नाही. सचिन प्रमाणेच त्याची मुलं अर्जुन आणि साराबाबतही सर्वांना उत्सुकता असते.
अर्जुन तेंडुलकर हा सचिनप्रमाणेच क्रिकेटपटू आहे. अर्जुन ऑल राऊंडर असून तो गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमचा सदस्य आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सनं पुन्हा एकदा करारबद्ध केलंय. तर अर्जुनची बहीण आणि सचिनची मुलगी सारा देखील क्रिकेट सामन्यांना नियमित उपस्थित असते. विशेषत: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना साराची हजेरी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
सारा पुढं काय करणार? याची अनेकांना उत्सुकता होती. सचिननं स्वत: 'एक्स' वर पोस्ट करत साराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची संचालिका म्हणून सारा काम करणार असल्याची घोषणा सचिननं केलीय.
'मला हे सांगायाला खूप आनंद होतोय की सारा आता सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची संचालिका म्हणून काम करणार आहे. सारानं लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलीय. सारा क्रीडा, आरोग्य, शिक्षण या माध्यमातून भारताला सक्षम बनवण्याचा प्रवास तिनं सुरु केला आहे, जागतिक शिक्षण कशा पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकतं याची आठवण करुन देणारी ही गोष्ट आहे,' असं सचिननं सांगितलं.