Shafali Verma: 'लेडी सेहवाग'चा वर्ल्ड रेकॉर्ड, 'हा' विक्रम करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू

Shafali Verma Double Hundred World record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील दमदार कामगिरीनंतर भारतीय महिला टीमनं एकमेव टेस्टच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Shafali Verma Double Hundred Record
मुंबई:

Shafali Verma Double Hundred World record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील दमदार कामगिरीनंतर भारतीय महिला टीमनं एकमेव टेस्टच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या ओपनिंग जोडीनं आफ्रिकन बॉलर्सची जोरदार धुलाई केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकमेव टेस्टमध्ये शफाली वर्मानं इतिहास रचला. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड शफाली वर्मानं  (Shafali Verma Fastest Double Hundred) केला. शफालीनं 194 बॉलमध्येच डबल सेंच्युरी पूर्ण केली. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहिल्याच दिवशी 500 पार

भारतीय महिला टीमनं पहिल्याच दिवशी 500 रनचा टप्पा पार करत आफ्रिकेवर वर्चस्व गाजवलं. शफालीनं 197 बॉलमध्ये 205 रन केले. या खेळीत तिनं 23 फोर आणि 8 सिक्स लगावले. शफालीला स्मृती मंधानानं 149 रन काढत भक्कम साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 292 रनची भागिदारी केली. महिला टेस्ट क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागिदारी आहे. 

महिला टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी भागिदारी

शफली वर्मा - स्मृती मंधाना - 292 रन
किरण बलूच - साजिदा शाह - 241 रन
कॅरोलनी एटकिन्स - अरन ब्रिंडल - 200 रन 

Advertisement

शफाली आणि स्मृतीच्या भागीदारीच्या जोरावर या टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारतीय टीमनं 4 आऊट 525 असा विशाल स्कोअर उभा केला आहे. 

(नक्की वाचा : IND vs ENG : भारतीय बॉलरनं घेतली अजब हॅटट्रिक, तुमच्या लक्षात आली का? )