Shahid Afridi got angry on Shaheen Afridi: आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाकडून (IND vs PAK, Asia Cup 2025) झालेल्या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापलाय. भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदीनं त्याचा जावई शाहीन आफ्रिदीला चांगलेच फटकारले आहे. शाहीनकडून त्याला काय हवंय हे आफ्रिदीनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सर्व जगाला सांगगितले.
काय म्हणाला आफ्रिदी?
पाकिस्तानच्या 'समां टीव्ही' शी बोलताना आफ्रिदी म्हणाला, ''शाहीननं काही रन्स केले. त्यामुळे आमची टीम शंभरी ओलांडू शकली, , हे चांगले झाले. पण मला शाहीनकडून रन्स नको, मला त्याच्याकडून चांगली बॉलिंग हवी आहे.
मला सॅम अयूबकडून बॉलिंग नको, मला त्याच्याकडून रन्स हवे आहेत. शाहीनला हे समजले पाहिजे की त्याची भूमिका नवीन बॉल स्विंग करणे आणि बॉलचा टप्पा पुढे ठेवून विकेट घेेणे आहे, त्याने स्वत:च्या खेळाच्या प्लॅनिंगवर लक्ष केंद्रित केले पाहिजे."
आफ्रिदी पुढे म्हणाला की, "शाहीनने ‘माइंड गेम' खेळला पाहिजे, तो सुरुवातीला विकेट घेऊ शकतो. मला असे वाटते की त्याने स्वत:च्या बॉलिंगच्या जीवावर पाकिस्तानला सामने जिंकवून द्यावेत."
भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीनने 16 बॉलमध्ये 33 रन्सची नाबाद खेळी केली होती, ज्यामुळे पाकिस्तानची टीम 127 रन्सपर्यंत पोहोचू शकली. त्याचवेळी बॉलिंगमध्ये शाहीन पूर्णपणे अपयशी ठरला, त्याने 2 ओव्हर्समध्ये 23 रन्स केले आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. अभिषेकने शाहीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर फोर आणि सिक्स मारत पाकिस्तानच्या अव्वल बॉलर्सची हवा काढली होती.
( नक्की वाचा : Shahid Afridi : आशिया कपपूर्वी शाहिद आफ्रिदीची भारतावर आगपाखड; 'सडके अंडे' म्हणत दिग्गज खेळाडूला डिवचले )
या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवले होते. पाकिस्तानचा एकही बॅटर चांगली बॅटिंग करू शकला नाही आणि त्याचबरोबर एकही बॉलर यशस्वी झाला नाही.