Jasprit Bumrah: टीम इंडियाचाच नाही तर सध्या जगातील सर्वोत्तम फास्ट बॉलर म्हणून जसप्रीत बुमराह ओळखला जातो. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहनं जीव तोडून बॉलिंग केली. त्याच्या बॉलिंगच्या जोरावर भारतीय टीम सीरिज बरोबरीत करण्याच्या उंबरठ्यावर आली होती. सिडनीमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमधील शेवटच्या इनिंगमध्ये बुमराह बॉलिंग करु शकला नाही. त्यामुळे सीरिज बरोबरीत सोडवण्याचं टीम इंडियाचं मिशन पूर्ण होऊ शकलं नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये झालेल्या दुखापतीमुळे बुमराह नुकतीच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळू शकला नाही. भारतानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. पण, आगमी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी बुमराह भारतासाठी महत्त्वाचा बॉलर आहे. बुमराह सध्या आयपीएल 2025 (IPL 2025) ची तयारी करत आहे. तो मुंबई इंडियन्सकडून या स्पर्धेत खेळणार आहे.
न्यूझीलंडचा दिग्गज बॉलर शेन बॉन्डनं बुमराहबाबत (Shane Bond big Statement on Jasprit Bumrah) एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये काळजीचं वातावरण आहे. बुमराहच्या पाठीची जिथं सर्जरी झाली होती तिथं पुन्हा त्याला दुखापत झाली तर त्याचं करिअर समाप्त होऊ शकतं, असं त्यानं सांगितलं. ईएसपीएनसोबत बोलताना बॉन्डनं ही काळजी व्यक्त केली. टॉप मॅनेजमेंटनं बुमराहच्या वर्कलोडवर फोकस करण्याची वेळ आता आलीय, असं बॉन्डनं सांगितलं.
( नक्की वाचा : Fact Check : विराट आऊट होताच 14 वर्षांच्या मुलीला आला Heart Attack! वडिलांनी सांगितलं सत्य )
माजी फास्ट बॉलर शेन बॉन्डनं सांगितलं की, फास्ट बॉलर टेस्ट क्रिकेटनंतर थेट T20 खेळण्यासाठी उतरला तर तो त्यासाठी मोठा धोका असतो. त्यामुळे टॉप मॅनेजमेंटनं विचार करुन बुमराहबाबत पावलं टाकणं आवश्यक आहे.
तो पुढे म्हणाला की, 'बुमराह ठीक राहिल पण, ते त्याच्या वर्कलोडवर अवलंबून आहे. त्याबाबत मॅनेजमेंटनं काळाजीपूर्वक नियोजन करावं. आगामी सीरिजचा विचार करता बुमराहला आराम मिळायला हवा. त्याला कधी आराम मिळायला हवा हे मॅनेजमेंटनं निश्चित केलं पाहिजे. त्याला कुठं जास्त धोका आहे, याचा विचार करायला हवा.
टीम इंडिया इंग्लंडमध्ये पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. त्यानं तिथं दोन पेक्षा जास्त टेस्ट मॅच खेळू नये असं माझं मत आहे. आयपीएलनंतर लगेच पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणे जोखमीचे ठरु शकते.' शेन बॉन्ड हा बुमराहचा मुंबई इंडियन्समध्ये कोच होता. त्यानं बुमराहसोबत बराच काळ घालवला आहे. त्यामुळे त्यानं दिलेला इशारा टीम मॅनेजमेंटनं गांभीर्यानं घेणे आवश्यक आहे.