Shardul Thakur Century : मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये (Mumbai vs Jammu and Kashmir Ranji Trophy Match) शार्दुल ठाकूरनं सेंच्युरी झळकाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईला तीन अंकी धावसंख्या गाठून देण्यात शार्दुलची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही टीम अडचणीत असताना त्यानं थेट सेंच्युरी झळकावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खडूस मुंबईकर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे खेळाडू हे शेवटपर्यंत झुंजण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वृत्तीला 'खडूस' हे विशेषण दिलं जातं. शार्दुलनं मुंबई क्रिकेटला साजेसा 'खडूस' खेळ करत टीमला संकटातून बाहेर काढलं.
शार्दुल बॅटिंगला आला त्यावेळी मुंबईची अवस्था 6 आऊट 101 अशी नाजूक होती. पहिल्या इनिंगमध्ये 86 रन्सनं पिछाडीवर असलेल्या मुंबईकडं जेमतेम 15 रनची आघाडी होती. मुंबईला मोठी आघाडी घेण्यात अपयश येणार असाच सर्वांचा अंदाज होता.
त्यावेळी शार्दुलनं झुंजार बॅटिंग करत सर्व चित्र बदललं. त्यानं तनुष कोटियानसोबत आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. शार्दुल -तनुष जोडीनं पहिल्या इनिंगमध्येही मुंबईकडून प्रतिकार केला होता. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये आठव्या विकेटसाठी 63 रनची भागिदारी केली होती.
दुसऱ्या इनिंगमध्येही या जोडीनं टीमला सावरलं. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे सर्व दिग्गज मुंबईकर दोन्ही इनिंगमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यावेळी शार्दुल आणि तनुष जोडीनं केलेल्या पार्टनरशिपनं मुंबईचं या मॅचममध्ये पुनरागमन झालं आहे.
( नक्की वाचा : Rohit Sharma : 6,6,6 रंगात येत होता रोहित शर्मा, तितक्यात केली चूक! )
शार्दुलची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ही दुसरी सेंच्युरी आहे. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 51 रन केले होते. शार्दूल गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्येही त्याला कुणी खरेदी केलं नव्हतं. आता पहिल्या इनिंगध्ये हाफ सेंच्युरी आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावत शार्दुलनं निवड समितीलाही संदेश दिला आहे.