Shikhar Dhawan: कोण आहे शिखर धवनची होणारी पत्नी Sophie Shine? कॉर्पोरेट जगात आहे मोठं नाव, वाचा सविस्तर माहिती

Shikhar Dhawan to Marry Sophie Shine : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shikhar Dhawan, Marry Sophie : शिखर आणि सोफी गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही सांगितले जात आहे.
मुंबई:

Shikhar Dhawan to Marry Sophie Shine in February 2026 : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनेक दिवसांपासून शिखर आणि सोफी शाईन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नवी दिल्लीमध्ये एका भव्य सोहळ्यात हा विवाह पार पडणार असून फेब्रुवारी 2026 च्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-एनसीआर परिसरात हा शाही विवाह सोहळा पार पडेल, असे वृत्त समोर आले आहे.

शिखर आणि सोफी गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखतात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान जेव्हा ते स्टेडियममध्ये एकत्र दिसले, तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा जगजाहीर झाली होती. 

काही वर्षांपूर्वी दुबईत त्यांची पहिली भेट झाली होती आणि हळूहळू या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे, हे दोघे गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही सांगितले जात आहे.

(नक्की वाचा : IND vs NZ: 5 मॅचमध्ये 4 सेंच्युरी तरीही टीम इंडियात जागा नाही ! न्यूझीलंड विरुद्धचा संघ पाहून सर्वांनाच धक्का )
 

कोण आहे सोफी शाईन?

शिखरची होणारी नवरी सोफी शाईन ही आयर्लंडची रहिवासी असून तिचे शिक्षणही तिथेच झाले आहे. तिने आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले असून लिमेरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे. 

Advertisement

ग्लॅमरच्या दुनियेत वावरणाऱ्या क्रिकेटर्सचे नाव अनेकदा अभिनेत्री किंवा मॉडेलसोबत जोडले जाते, मात्र सोफीचे बॅकग्राउंड पूर्णपणे कॉर्पोरेट क्षेत्रातील आहे.

सोफी सध्या अबुधाबी येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये सेकंड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. एवढेच नाही तर ती शिखर धवनच्या 'दा वन स्पोर्ट्स' या उपक्रमांतर्गत चालणाऱ्या 'शिखर धवन फाउंडेशन'ची धुराही सांभाळत आहे. 

सोफीचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोइंग असून इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 341,000 फॉलोअर्स आहेत. ती गेल्या अनेक दिवसांपासून शिखरसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होती, ज्याला आता लग्नाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

Advertisement

शिखरचे पहिले लग्न आणि वैयक्तिक आयुष्य

शिखर धवनचे पहिले लग्न आयशा मुखर्जीसोबत झाले होते, मात्र 2023 मध्ये त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. त्यांना 11 वर्षांचा जोरावर नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर शिखरने स्वतःला सावरले आणि आता तो सोफीसोबत आयुष्याची नवी सुरुवात करण्यास तयार आहे. शिखरने स्वतःच एका मुलाखतीत आपल्या नात्याची कबुली दिली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आता या लग्नाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement