Team India Squad Announced vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वन-डे आणि T20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांचा अपेक्षेप्रमाणे समावेश करण्यात आलाय. पण, पाच मॅचमध्ये 4 सेंच्युरी लगावत टीम इंडियाची दार ठोठावणाऱ्या खेळाडूकडं दुर्लक्ष करण्यात आलंय.
5 मॅच 4 सेंच्युरी पण जागा नाही
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचा शैलीदार बॅटर देवदत्त पडिक्कल चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं 5 मॅचमध्ये (Devdutt Padikkal) 514 रन्स केले आहेत. यामध्ये तब्बल 4 सेंच्युरींचा समावेश असून त्याची सरासरी 102.80 इतकी आहे. विजय हजारेच नाही तर अन्य स्पर्धांमध्येही देवदत्त सातत्यानं रन्स करत आहे. त्यामुळे आगामी सीरिजमध्ये त्याला संधी मिळेल अशी चर्चा होती. पण, निवड समितीनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा या सीरिजसाठी समावेश होईल अशी चर्चा होती. पण, त्याची प्रतीक्षा कायम आहे. तर माध्यमांमधील चर्चा फोल ठरवत ऋषभ पंतनं टीममध्ये स्थान मिळवलंय.
( नक्की वाचा : हिटमॅनचा 'विराट' पराक्रम! 2025 मध्ये रोहितने केले तब्बल 62 रेकॉर्ड्स, वाचा संपूर्ण यादीहिटमॅनचा 'विराट' पराक्रम! 2025 मध्ये रोहितने केले तब्बल 62 रेकॉर्ड्स, वाचा संपूर्ण यादी )
श्रेयस अय्यरचं पुनरागमन
मुंबईकर श्रेयस अय्यरचं दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन झालंय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये कॅच घेताना तो गंभीर जखमी झाला होता. श्रेयस या टीमचा व्हाईस कॅप्टन असेल. तर शुबमन गिल कॅप्टन आहे. अर्थात श्रेयसचा समावेश हा फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच होणार असल्याचं निवड समितीनं स्पष्ट केलंय.
न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजप्रमाणेच टी20 साठी सीरिजसाठीही टीम इंडियाची घोषणा निवड समितीनं केली आहे. दोन्ही देशांमधील वन-डे सीरिज 11 जानेवारीपासून सुरु होत आहे. तर 5 सामन्यांच्या T20 सीरिजला 23 जानेवारीपासून सुरुवात होईल. T20 वर्ल्ड कपपूर्वीची शेवटची ही सीरिज असल्यानं याला मोठं महत्त्व आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी भारतीय टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), वाशिंगटन सुंदर, रविंद्र जडेजा , मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयसवाल
न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय टीम : सूर्यकुमार यादव (कॅप्टन) जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अर्शदीप सिंह, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रिंकू सिंह.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world