Shubman Gill : इंग्लंड दौऱ्यानंतर शुबमन गिलचं प्रमोशन, आशिया चषकमध्ये मिळणार मोठी जबाबदारी!

Shubman Gill : शुभमन गिल लवकरच टी-20 आंतरराष्ट्रीय संघात परतण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shubman Gill : आशिया कप स्पर्धा 9 स्प्टेंबरपासून सुरु होत आहे.
मुंबई:

Shubman Gill : शुभमन गिल लवकरच टी-20 आंतरराष्ट्रीय संघात परतण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असलेल्या गिलची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड निश्चित मानली जातीय. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. 

गिलनं टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून पहिल्याच सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानं इंग्लंड विरुद्धच्या 5 टेस्टमध्ये 754 रन्स काढले. तसंच टीम इंडियानं ही सीरिज 2-2 अशी बरोबरीत रोखली. 
RevSportz च्या वृत्तानुसार, गिल केवळ टी-20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करणार नाही, तर त्याला या स्पर्धेसाठी व्हाईस कॅप्टन बनवले जाण्याची शक्यता आहे.

काय आहे नवी अपडेट?

या वृत्तानुसार, ''सूर्यकुमार यादव या स्पर्धेसाठी तंदुरुस्त असणार आहे, जी यावर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. शुबनन गिल या टीमचा व्हाईस कॅप्टन असण्याची शक्यता आहे. ''

गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर अक्षर पटेल T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन आहे.  

Advertisement

( नक्की वाचा : Sanju Samson : 'माझा प्रवास खरोरच सुंदर...' राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या चर्चेवर संजूनं सोडलं मौन )

शुबमन गिलचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर लगेच झाला होता.  गिल श्रीलंका सीरिजमध्ये खेळला होता.  गौतम गंभीरचा हेड कोच म्हणून तो पहिलाच सामना होता.

दरम्यान, भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार सूर्यकुमारने आगामी आशिया चषकापूर्वी पूर्ण फिटनेस मिळवण्याचे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. तो सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) सेंटरमध्ये आहे. सूर्या सध्या नेटमध्ये बॅटिंग करत आहे.

Advertisement

सूर्याचा दमदार रेकॉर्ड

रोहित शर्माने 2024 मधील टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादव T20I टीमचा कॅप्टन बनला. त्याचा टी-20 आंतरराष्ट्रीय कॅप्टन म्हणून दमदार रेकॉर्ड आहे.

सूर्यकुमारने भारताचे 22 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे, त्यापैकी 17 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, सूर्यकुमारने 38.2 च्या सरासरीने आणि 167.07 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 2,598 रन्स केल्या आहेत. तो शेवटचा जूनमध्ये मुंबई टी-20 लीगमध्ये Triumph Knights Mumbai North East संघाकडून क्रिकेटच्या मैदानात उतरला होता, जिथे त्याने चार इनिंगमध्ये 122 रन्स केले होते.
 

Advertisement
Topics mentioned in this article