Smriti-Palash Wedding: स्मृती-पलाश 7 डिसेंबरला लग्न करणार? व्हायरल चर्चांवर स्मृतीचा भाऊ काय म्हणाला?

सोशल मीडियावर पलाश-स्मृतीच्या लग्नाची नवीन तारीख आता व्हायरल होत आहे. मंगळवारी सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची नवीन तारीख 7 डिसेंबर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही बातमी केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding: भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा बहुप्रतिक्षित विवाह सोहळा 23 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. परंतु लग्नाच्या दिवशी लग्नसोहळा अचानक पुढे ढकलण्यात आला. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा पुढे ढकल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु आहे.

दरम्यान सोशल मीडियावर पलाश-स्मृतीच्या लग्नाची नवीन तारीख आता व्हायरल होत आहे. मंगळवारी सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची नवीन तारीख 7 डिसेंबर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही बातमी केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना स्मृतीचा भाऊ श्रवण मानधना याने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. "मला या अफवांबद्दल कोणतीही कल्पना नाही. आतापर्यंत तरी लग्न पुढेच ढकलले आहे. त्याने 7 डिसेंबरच्या सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Samantha Marriage : समांथानेच नागा चैतन्यला धोका दिला? राजसोबत सिक्रेट लग्नानंतर अभिनेत्रीवर चाहते संतापले!)

स्मृतीने फोटो केले डिलीट

विवाह पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या. मात्र, पलाशसोबतचे काही साधे फोटो अजूनही कायम आहेत. याच दरम्यान, मंगळवारी सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची नवीन तारीख 7 डिसेंबर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

Advertisement

लवकरच लग्न होईल, पलाशच्या आईला खात्री

पलाशची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले की, पलाश स्मृतीला घरी घेऊन येण्याचे स्वप्न पाहत होता आणि त्यांनी स्मृतीचे विशेष स्वागत करण्याची योजनाही आखली होती. मात्र काही परिस्थितीमुळे विधी पुढे ढकलावे लागले. मात्र अमिता मुच्छल यांना खात्री आहे की, लग्न लवकरच होईल.