Smriti Mandhana: स्मृती मानधनानं लग्न मोडल्यानंतर, 'बेस्ट फ्रेंड' Jemimah ची गूढ पोस्ट चर्चेत,अर्थ माहिती आहे?

Smriti Mandhana Calls Off Wedding With Palash Muchhal : स्मृती मानधनानं लग्न मोडल्यानंतर जेमिमाची कृती सध्या चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Smriti Mandhana Calls Off Wedding With Palash Muchhal : काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा,अफवा आणि फॅन्सच्या अनेक उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, टीम इंडियाची व्हाईस कॅप्टन स्मृती मानधनाने संगीतकार पलाश मुच्छल सोबतचं लग्न अधिकृतपणे मोडल्याची घोषणा केली.

स्मृतीचा भावनिक निर्णय

स्मृती आणि पलाश यांचं 23 नोव्हेंबरला लग्न होणार होतं. पण स्मृतिचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक वैद्यकीय समस्या उद्भवल्याने हा समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर, पलाश मुच्छललाही तणावामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

या घडामोडीनंतर दोन आठवड्यांनी (7 डिसेंबर) स्मृतीनं  इन्स्टाग्रामवर हे लग्न मोडल्याची घोषणा केली आणि फॅन्सना खासगीपणा राखण्याची विनंती केली. स्मृती मानधना  तिच्या खासगी स्वभावासाठी ओळखली जाते, तिने या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सार्वजनिकपणे हे विधान केले.

( नक्की वाचा : IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या T20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पण सर्वात मोठा प्रश्न कायम! )
 

स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत आणि या क्षणी मी बोलणे महत्त्वाचे मानते. मी एक खूप खासगी व्यक्ती आहे आणि मला तसंच राहायला आवडेल, पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की, हे लग्न मोडले आहे."

Advertisement

स्मृतीने पुढे आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल सांगितले की, "माझा विश्वास आहे की आपल्याला चालवणारा एक उच्च उद्देश आहे, आणि माझ्यासाठी तो नेहमीच देशाचं सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे आहे. मला शक्य तितक्या जास्त काळ भारतासाठी खेळायचे आहे आणि ट्रॉफी जिंकायच्या आहेत, आणि यावरच माझं लक्ष कायम असेल."

जेमिमाची साथ आणि इन्स्टाग्रामवरची ‘गूढ' कृती

या संपूर्ण कठीण परिस्थितीत, एक व्यक्ती स्मृतिला मोठा आधार देत होती, ती म्हणजे तिची टीममेट जेमिमा रॉड्रिग्स. यापूर्वी, स्मृतीचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते, तेव्हा जेमिमाने ऑस्ट्रेलियातील वुमन्स बिग बॅश लीगची (Women's Big Bash League) मोहीम अर्धवट सोडून भारतात स्मृतिच्या मदतीला धावली होती.

Advertisement

आता लग्न अधिकृतपणे मोडल्याचे जाहीर झाल्यावर, जेमिमाने पुन्हा एकदा तिची मैत्रीण आणि टीममेटच्या बाजूने उभी राहिली आहे. रातिने इन्स्टाग्राम स्टोरीवर ओलिव्हिया डीन (Olivia Dean) या गायिकेचे हिट गाणे ''मॅन आय नीड" (Man I Need) गाणाऱ्या तरुण गायकांचा एक गूढ फोटो शेअर केला.

फॅन्सनी लगेचच या गाण्याच्या ओळी (Lyrics) चेक केल्या, ज्यात "Looks like we're making up for lost time. Need you to spell it out for me." (आम्ही गमावलेल्या वेळेची भरपाई करत आहोत असं दिसतंय. तुला माझ्यासाठी ते स्पष्ट करण्याची गरज आहे.) अशा खोल आणि भावनिक ओळी आहेत.त्यामुळे जेमिमानं हे गाणं का शेअर केलं हे सर्वांच्या लक्षात आलं. 

Advertisement

याशिवाय,जेमिमाने इन्स्टाग्रामवर पलाश मुच्छलला अनफॉलो केलं असल्याकडंही काही फॅन्सनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.