Smriti Mandhana: स्मृती मंधनाचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळ, दमदार सेंच्युरीसह विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन स्मृती मंधाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मॅचमध्ये इतिहास रचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Smriti Mandhana : स्मृती मंधनानं ऐतिहासिक कामगिरी करत चक्क विराट कोहलीला मागं टाकलं
मुंबई:

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन स्मृती मंधाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मॅचमध्ये इतिहास रचला आहे. स्मृतीने फक्त 50 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकून आंतरराष्ट्रीय वन-डेमधील सर्वात वेगवान भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा विक्रम केला आहे. इतकंच नव्हे, तर महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान सेंच्युरी आहे. इतकंच नाही तर स्मृती आता वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरी झळकावणारी भारतीय बनली आहे. तिनं विराट कोहलीला मागे टाकलंय. 

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 413 रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना स्मृतीनं भारताला जबरदस्त सुरुवात केली. तिनं फक्त 23 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली. भारताकडून वन-डे मध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी झळकावण्याचा विक्रमही तिनं यावेळी केला. हाफ सेंच्युरीनंतरही स्मृतीचा धडाका सुरुच होता.

स्मृतीनं ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्लची पिटाई करत 50 बॉलमध्ये 14 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं सेंच्युरी झळकावली. अखेर स्मृती 63 बॉलमध्ये 125 रन्स काढून आऊट झाली. या खेळीत तिनं 17 फोर आणि 5 सिक्स लगावले. स्मृतीला कॅप्टन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) चांगली साथ दिली. तिनं 35 बॉलमध्ये 52 रन्स केले. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 69 बॉलमध्ये 121 रन्सची पार्टनरशिप केली.

( नक्की वाचा : कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )
 

ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने 75 बॉलमध्ये 138 रन्सची तुफानी खेळी केली. मुनीनं 23 फोर आणि 1 सिक्स लगावला. कॅप्टन एलिसा हिलीने 18 बॉलमध्ये 30 रन्स केले. तर, जॉर्जिया वोलने हाफ सेंच्युरी झळकावत 68 बॉलमध्ये 81 रन्स केले. एलिस पेरीने 72 बॉलमध्ये 68 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

Advertisement

भारताकडून अरुंधती रेड्डीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मात्र, एकाही भारतीय बॉलरला 6 च्या इकोनॉमी रेटपेक्षा कमी रन्स करता आले नाहीत. , त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 413 धावांचा डोंगर उभा केला. भारताला हा सामना जिंकण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्याकडून विशेष खेळीची अपेक्षा आहे.