
South Africa vs Australia, WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच इंग्लंडमधील लॉर्ड्सवर सुरु आहे. या फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी दाणदाण उडवली. सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशानं फायनलमध्ये उतरलेल्या कांगारुंना पहिल्या दिवशी आफ्रिकन बॉलर्सनी जोरदार हादरे दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) सर्वात जास्त 5 विकेट्स घेतल्या. रबाडानं 51 रन्समध्ये ऑस्ट्रेलियाची निम्मी टीम परत पाठवली. रबाडाला मार्को यान्सेननं 3 विकेट्स घेत भक्कम साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 212 रन्सवरच संपुष्टात आली.
Kagiso Rabada delivers big time for South Africa with two wickets in an over 🔥
— ICC (@ICC) June 11, 2025
Catch the action live on our official broadcasters here ➡ https://t.co/oas2Rsdptj#Cricket #CricketReels #WTC25 pic.twitter.com/I9vOR8nCup
रबाडाचा धमाका
रबाडानं दक्षिण आफ्रिकेला झटपट यश मिळवून दिलं. त्यानं सुरुवातीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जास्त रन्स करणाऱ्या उस्मान ख्वाजाला शून्यावर आऊट केलं. त्यानंतर कॅमेरुन ग्रीनला 4 रन्सवर परत पाठवलं. ग्रीनला आऊट करताच रबाडानं खास रेकॉर्ड केला. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 विकेट्स घेणारा तो 10 वा आफ्रिकन बॉलर आहे.
( नक्की वाचा : जगातील एकमेव क्रिकेटपटू जे भारताकडून पदार्पण करण्यापूर्वी इंग्लंडकडून खेळले, पदार्पणातच झळकावली सेंच्युरी )
कागिसो रबाडाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच प्रभावी कामगिरी झाली आहे. त्याने 11 मॅचमध्ये 22.27 च्या सरासरीने 53 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 38.8 आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 64 बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 किंवा त्याहून जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी केवळ दोन बॉलर्सचा स्ट्राइक रेट 40 पेक्षा कमी आहे.
ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या इनिंगमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने हाफ सेंच्युरी झळकावली. ब्यू वेबस्टरने 11 फोरच्या मदतीने 72 रन्सची खेळी केली, तर स्मिथने 10 फोर लगावत 66 रन्स काढले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world