FIFA WC 2026: मेस्सीचं स्वप्न भंगलं! स्पेन विश्वविजेता; 16 वर्षांनंतर फुटबॉल चॅम्पियन

फुटबॉलच्या पंढरीत, मेटलाइफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

FIFA World Cup 2026: फुटबॉलच्या पंढरीत, मेटलाइफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा एक्स्ट्रा टाइममध्ये १-० असा पराभव करून दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. कोच लुइस डे ला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या स्पेनच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत दाखवलेला संयम आणि तांत्रिक कौशल्य अंतिम सामन्यातही दिसून आले.

मेस्सीचा स्वप्नभंग; स्पेन विश्वविजेता!

​सामन्याचे चित्र पाहिले तर सुरुवातीपासूनच स्पेनने चेंडूवर ताबा (पझेशन) ठेवत अर्जेंटिनावर दबाव निर्माण केला होता. अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज याने अनेकवेळा स्पेनचे प्रयत्न हाणून पाडले, ज्यामुळे सामना गोलशून्य स्थितीत सुरू राहिला. सामन्याला कलाटणी मिळाली ती स्टॉपेज टाइममध्ये, जेव्हा अर्जेंटिनाचा मिडफील्डर एंजो फर्नांडीज याला रेड कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला १० खेळाडूंसह खेळावे लागले.

Advertisement

​या संधीचा फायदा घेत एक्स्ट्रा टाइमच्या दुसऱ्या हाफमध्ये निको विलियम्सने दिलेल्या अचूक पासवर फेरान टोरेसने गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला. संपूर्ण स्पर्धेत स्पेनची बचावफळी अभेद्य राहिली, त्यांनी सात सामन्यांत केवळ एक गोल खाल्ला. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने पूर्ण जोर लावला असला तरी, स्पेनच्या शिस्तबद्ध खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. स्पेनचे हे यश त्यांच्या फुटबॉल संस्कृतीचा आणि नवीन पिढीच्या गुणवत्तेचा विजय मानला जात आहे.

FIFA WC 2026: 'फिफा' जिंकणाऱ्याची छप्परफाड कमाई! बक्षीस अन् तिकिटाची किंमत वाचून डोळे फिरतील; विजेते मालामाल

एम्बाप्पेने जिंकला गोल्डन बूट, रोड्रीकडे गोल्डन बॉल

  • गोल्डन बॉल (सर्वोत्कृष्ट खेळाडू): रोड्री (स्पेन)
  • सिल्व्हर बॉल: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
  • ब्राँझ बॉल: किलियन एमबाप्पे (फ्रान्स)
  • गोल्डन बूट (सर्वाधिक गोल करणारा खेळाडू): किलियन एमबाप्पे (फ्रान्स) — १० गोल
  • सिल्व्हर बूट: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
  • ब्राँझ बूट: ज्यूड बेलिंगहॅम (इंग्लंड)
  • गोल्डन ग्लोव्ह (सर्वोत्कृष्ट गोलरक्षक): उनाई सिमॉन (स्पेन)
  • सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू: पाऊ कुबार्सी (स्पेन)
  • फेअर प्ले अवॉर्ड: नेदरलँड्स

FIFA World Cup 2026: ...तर Messi आज स्पेनच्या जर्सीत दिसला असता! एका VHS टेपची कधीही न ऐकलेली कहाणी


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world