रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आणखी एका दिग्गजानं केला टेस्ट क्रिकेटला अलविदा

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Angelo Mathews Announces Retirement From Test Cricket: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांनी काही दिवसांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या निवृत्तीवर अद्यापही चर्चा सुरु आहे. त्याचवेळी आणखी एका अनुभवी ऑलराऊंडरनं टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

श्रीलंका क्रिकेट टीममधील अनुभवी ऑलराऊंडर अँजेलो मॅथ्यूजने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. बांगलादेशविरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या सीरिजमध्ये तो शेवटचा पांढऱ्या जर्सीत दिसेल. 

Advertisement

37 वर्षांच्या या दिग्गज क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी त्याने मर्यादित ओव्हर्सच्या फॉरमॅटबद्दलही विचार शेअर केले आहेत. भविष्यात देशाला माझी गरज लागली तर मी व्हाईट बॉल क्रिकेटसाठी उपलब्ध असेल, असं त्यानं जाहीर केलं आहे. 

Advertisement

Advertisement

( नक्की वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीचं कारण उघड, BCCI नं फेटाळली होती 'ती' मागणी! )

मॅथ्यूज काय म्हणाला?

मॅथ्यूजने या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'माझ्या प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार. अगणित आठवणींसह आता टेस्ट क्रिकेटमधून निरोप घेण्याची वेळ आली आहे. गेल्या 17 वर्षांपासून श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि अभिमानाची गोष्ट होती.  एखादा खेळाडू राष्ट्रीय संघाची जर्सी घालतो, तेव्हा त्याच्या आत देशाची सेवा करण्याची जी भावना येते, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. मी क्रिकेटला सर्व काही दिले आहे. त्या बदल्यात मला क्रिकेटकडूनही खूप काही मिळाले आहे. खेळाने मला आज मी जो आहे, तो माणूस बनवले.

'मी हजारो श्रीलंकन ​​क्रिकेटप्रेमींचे मनापासून आभार मानतो. ज्यांनी माझ्या कारकिर्दीच्या चढ-उतारात नेहमी मला साथ दिली. मी श्रीलंका क्रिकेट आणि सर्व प्रशिक्षकांचाही खूप आभारी आहे. आयुष्यातील एक अध्याय संपत आहे, पण या खेळावर माझे प्रेम नेहमीच कायम राहील.'

मॅथ्यूजची टेस्ट कारकीर्द

मॅथ्यूजनं आत्तापर्यंत श्रीलंकेसाठी 118 टेस्ट खेळल्या आहेत. त्यामधील 210 इनिंगमध्ये 44.63 च्या सरासरीनं 8167 रन्स केले. तर बॉलिंग करताना 86 इनिंगमध्ये 54.48 च्या सरासरीनं 33 विकेट्स घेतल्या आहेत. 
 

Topics mentioned in this article