Suraj Nikam :'कुमार महाराष्ट्र केसरी' सुरज निकमनं संपवलं आयुष्य, कृस्ती विश्वावर शोककळा

जाहिरात
Read Time: 1 min
Suraj Nikam
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

Kumar Maharashtra Kesari Suraj Nikam  : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील  नागेवाडी येथील  मातब्बर पैलवान सुरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी (28 जून) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकाराने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 सुरज निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेञातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना  त्याने आस्मान दाखवले आहे. परंतू आज त्याने राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपविले.

त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजलेलं नसलं तरी  वडिलांचे निधन झाल्यानंतर तो व्यथित होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article