T20 WC 2026 : आता खरी लढाई सुरू! टीम इंडियाचे सुपर-8 मधील प्रतिस्पर्धी ठरले; पाहा संपूर्ण शेड्युल

Team India Super 8 Schedule: टी 20 वर्ल्ड कपची रंगत आता वाढत चाललीय. क्रिकेट विश्वातील बलाढ्य आणि या स्पर्धेच्या माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Team India Super 8 Schedule: टीम इंडियासाठी सुपर 8 मधील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.
मुंबई:

T20 World Cup 2026 Super 8 Schedule: टी 20 वर्ल्ड कपची रंगत आता वाढत चाललीय. क्रिकेट विश्वातील बलाढ्य आणि या स्पर्धेच्या माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. मंगळवारी मंगळवारी झिम्बाब्वेने ग्रुप B मधून पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर 8 मध्ये प्रवेश केला. झिम्बाब्वेच्या सुपर 8 मधील प्रवेशानंतर यजमान भारताचे या फेरीतील प्रतिस्पर्धी आता पूर्णपणे निश्चित झाले आहेत. भारतीय संघ या दुसऱ्या टप्प्यातील आपल्या मोहिमेची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या लढतीने करणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाईल.

कसे ठरले सुपर 8 चे गट?

सुपर 8 फेरीचे स्वरूप समजून घेणे चाहत्यांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये एकूण 8 टीमची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वीच ठरलेल्या सीडिंगनुसार हे गट निश्चित करण्यात आले होते. म्हणजेच एखादी टीम त्यांच्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर असो किंवा दुसऱ्या, त्याचे सुपर एटमधील स्थान आधीच ठरलेले होते. 

एखादी मानांकित टीम टॉप 2 मध्ये स्थान मिळवू शकला नाही, तर त्याच्या जागी पात्र ठरणारा पुढचा संघ त्या जागेवर येतो. यावेळी ग्रुप B मधून ऑस्ट्रेलियाला बाहेर पडावे लागल्यामुळे त्यांच्या जागी आता झिम्बाब्वेचा संघ ग्रुप 1 मध्ये दाखल झाला आहे.

( नक्की वाचा : Smriti Mandhana : अंगात होता ताप पण मनात निर्धार! स्मृतीचा RCB कोचनं सांगितलेला थरारक अनुभव वाचून वाटेल अभिमान )

टीम इंडियाचे सुपर एटमधील वेळापत्रक (Team India Super 8 schedule )

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 22 फेब्रुवारी, अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना भारतासाठी मानसिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरेल. अहमदाबादच्या मोठ्या मैदानावर दोन्ही संघांमधील बॅटर्स आणि बॉलर्समध्ये जोरदार लढत पाहायला मिळेल. या विजयामुळे सेमीफायनलचा रस्ता सुकर होऊ शकतो.

Advertisement

भारत विरुद्ध झिम्बाब्वे, 26 फेब्रुवारी, चेन्नई

चेन्नईच्या फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर झिम्बाब्वेचे आव्हान भारतासमोर असेल. ऑस्ट्रेलियाला मागे टाकून इथपर्यंत पोहोचलेल्या झिम्बाब्वेला भारत हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. इथला विजय भारताला पॉईंट टेबलमध्ये वरच्या स्थानी नेण्यासाठी मदत करेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, 1 मार्च, कोलकाता

सुपर एट फेरीतील शेवटची लढत वेस्ट इंडिजसारख्या स्फोटक संघासोबत असेल. ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांचे बॅटर्स मोठ्या प्रमाणात रन काढण्यासाठी सज्ज असतील. सेमीफायनलचे तिकीट नक्की करण्यासाठी हा सामना निर्णायक ठरेल.
 

Advertisement
Topics mentioned in this article