WPL 2026 Final: बडोदामध्ये गुरुवारी (5 फेब्रुवारी 2026) झालेल्या डब्ल्यूपीएल 2026 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची कॅप्टन स्मृती मानधना हिने आपल्या जिद्दीने इतिहास रचला आहे. अंगात तीव्र ताप आणि फ्लू असतानाही स्मृतीने मैदानात उतरून दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिच्या या झंझावाती खेळीमुळे आरसीबीने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला. स्मृतीची ही स्पेशल खेळी क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे.
स्मृती होती फायनलपूर्वी आजारी
आरसीबीचे हेड कोच मालोलन रंगराजन यांनी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मृतीची फायनलपूर्वी कशी अवस्था होती याचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, फायनलच्या महत्त्वाच्या दिवशी स्मृतीला प्रचंड ताप होता आणि तिला फ्लू झाला होता.
तिची प्रकृती पाहता ती खेळू शकेल की नाही अशी शंका होती, मात्र स्मृतीने आपला आजारपणाचा कोणताही परिणाम खेळावर होऊ दिला नाही. जेव्हा मालोलन यांनी तिला विचारले, तेव्हा ती म्हणाली की कोणताही त्रास नाही, मी नक्कीच खेळणार. तिच्या या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळेच आरसीबीला हे यश मिळाले आहे.
( नक्की वाचा : Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं? )
स्मृतीचा झंझावात आणि ऑरेंज कॅपवर कब्जा
दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना हिने आक्रमक पवित्रा घेतला. तिने अवघ्या 41 बॉल्समध्ये 87 रन्सची तुफानी खेळी साकारली. या खेळीत तिने जॉर्जिया वॉलसोबत भक्कम भागीदारी करत दिल्लीच्या बॉलर्सवर पूर्णपणे दबाव टाकला.
That winning feeling! 🥳🏆@RCBTweets captain Smriti Mandhana receives the #TATAWPL 2026 winners' trophy from BCCI Hon. President Mr. Mithun Manhas and BCCI Hon. Secretary Mr. Devajit Saikia 🙌#ClaimTheCrown | #RCBvDC | #Final | @MithunManhas | @lonsaikia pic.twitter.com/et3GJjd7x6
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
या शानदार खेळीच्या जोरावर स्मृतीने डब्ल्यूपीएल 2026 च्या सीझनमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावले असून, तिला मानाची ऑरेंज कॅप देखील मिळाली आहे.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभवचं वादळ, फक्त 30 बॉलमध्ये ठोकले 150 रन्स! )
बेंगळुरूच्या रस्त्यांवर फॅन्सचा मोठा जल्लोष
आरसीबीने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरात चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. 'ई साला कुडा कप नाम्दु' या घोषणेने संपूर्ण शहर दुमदुमून गेले आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सची अवस्था पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानण्याची झाली. स्मृती मानधना हिने आजारी असतानाही ज्या पद्धतीने टीमला लीड केले आणि स्वतः मॅच विनिंग खेळी खेळली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world