रोहित शर्माचं शतक हुकलं, पण अर्धा डझन रेकॉर्ड केले नावे

रोहित शर्मा T20 विश्वचषक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने एका डावात 8 षटकार मारून युवराज सिंगला मागे टाकले आहे. युवराजने 2007 मध्ये डरबनमध्ये इंग्लंडविरुद्ध 8 षटकार मारले होते.

Advertisement
Read Time: 2 mins

टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने अवघ्या 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने 7 चौकार आणि 8 षटकार लगावले. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. रोहितच्या आजच्या सामन्यात जवळपास अर्धा डझन रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहित शर्माने आजच्या सामन्यात केलेले रेकॉर्ड

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्मा T20 विश्वचषक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने एका डावात 8 षटकार मारून युवराज सिंगला मागे टाकले आहे. युवराजने 2007 मध्ये डरबनमध्ये इंग्लंडविरुद्ध 8 षटकार मारले होते.

(नक्की वाचा- भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने 'खेळ' केला तर... कसं असेल सेमीफायनलचं गणित?)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार

  • 131*-  रोहित शर्मा (ऑस्ट्रेलिया)
  • 130 -  ख्रिस गेल (इंग्लंड)
  • 88 - रोहित शर्मा (वेस्ट इंडीज)
  • 87 -  ख्रिस गेल (न्यूझीलंड)
  • 86 - शाहिद आफ्रिदी (श्रीलंका)

T20 विश्वचषकात भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

  • सुरेश रैना- 101 धावा (दक्षिण आफ्रिका, 2010)
  • रोहित शर्मा - 92 धाव (ऑस्ट्रेलिया, 2024)
  • विराट कोहली - 89 धावा (वेस्ट इंडिज, 2016)
  • विराट कोहली - 82 धावा (ऑस्ट्रेलिया, 2022)
  • विराट कोहली -  82 धावा (पाकिस्तान, 2022)

(नक्की वाचा- झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिल कॅप्टन)

T20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध 94 धावा (2024)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध 79 धावा (2010) 
  • अफगाणिस्तान विरुद्ध 74 धावा (2021)
  • वेस्ट इंडीज 62 धावा (2014)

T20 विश्वचषकात कर्णधाराची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

  • ख्रिस गेल - 98 धावा (भारत, 2010)
  • रोहित शर्मा - 92 धावा (ऑस्ट्रेलिया, 2024)
  • ख्रिस गेल - 88 धावा (ऑस्ट्रेलिया, 2009)
  • केन विल्यमसन - 85 (ऑस्ट्रेलिया, 2021)
     
Topics mentioned in this article