बांगलादेश: क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालला चालू सामन्यादरम्यान मैदानावर हार्ट अटॅक आल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने क्रिडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला सावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाईनपुकुर क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात इक्बालने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी शेख फझिलातुन्नासा मुजीब रुग्णालयात नेण्यात आले.
मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला सावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाईनपुकुर क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात इक्बालने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी शेख फझिलातुन्नासा मुजीब रुग्णालयात नेण्यात आले.
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा तमीम देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे चर्चेत आहे. राष्ट्रीय कर्तव्यांपासून दूर राहिल्यानंतर आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध नसल्याची पुष्टी केल्यानंतर, त्याने फॉर्च्यून बरीशालला बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) 2025 चे विजेतेपद मिळवून दिले. बीपीएलमध्ये त्याने 14 सामने खेळले आणि 413 धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता.