
मेरठमधील सौरभ हत्याकांडाचा घटनाक्रम पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मुस्कान रस्तोगीने आपलाच पती सौरभ राजपूत याच्या हत्येचा प्लान आखला. यासाठी तिने प्रियकरा साहिल शुक्ला याची मदत घेतली. सौरभची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची तुकडे केले. ड्रममध्ये टाकले आणि ड्रम सिमेंटने पॅक केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल शुक्लाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. साहिलच्या खोलीत जेव्हा उत्तर प्रदेशचे पोलीस पोहोचले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्याच्या खोलीतील दृश्य पाहून साहिल हा अघोरी कृत्याच्या अधिन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या खोलीत सर्व अस्ताव्यस्त पडलेलं होतं. अॅश ट्रेमध्ये सिगारेट-गांजाचे पफ होते. बिअरच्या रिकाम्या बाटल्या खोलीच्या एका कोपऱ्यात पडलेल्या होत्या. खोलीच्या एका भिंतीवर भगवान शंकराचं चित्र आहे. त्याशिवाय दुसऱ्या भिंतीवर एक विचित्र पेंटिग्ज होती.
नक्की वाचा - Meerut Murder Case : 'पप्पा ड्रममध्ये आहेत', सौरभ-मुस्कानची 6 वर्षांची मुलगी शेजाऱ्यांना सांगत होती
या पेटिंगचा अर्थ काय?
गुगल लेन्सचा उपयोग करून या चित्राबद्दल शोधण्यात आलं तर याबाबत हैराण करणारी माहिती समोर आली आहे. गुगलने या पेंटिगबद्दल सांगितल्यानुसार, 666 ही संख्या आणि उलटा पेंटाग्राम गुप्त किंवा राक्षसी प्रतिक असल्याचं मानलं जातं. 6 ही संख्या प्रेम, करूण, संतुलनाचं प्रतिक मानलं जातं. मात्र ख्रिश्चन धर्मात 666 याचा नकारात्मक अर्थ आहे, याला राक्षसी संख्या किंवा सैतानी संख्या म्हटलं जातं. या संख्येला बायबलच्या Book of Revelation शी जोडलं जातं. या चित्रातील विविध चिन्हांचा अर्थ चांगलं-वाईटांमधील द्वंद्व, रहस्यमय गणितीय आणि वैज्ञानिक संदर्भाशी जोडला जातो.
असं म्हटलं जातं की, मेरठमध्ये झालेल्या थरकाप उडवणाऱ्या हत्येने केवळ नात्यांची मर्यादा पार केली नाही तर हे प्रकरण अंधविश्वास, तंत्र-मंत्र आणि रहस्यमय प्रतिकांशीही जोडलं गेलं आहे. सौरभच्या हत्येमागे केवळ प्रेम-प्रकरण नाही. तर साहिल शुक्लाची मानसिकतेवरही अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्याच्या खोलीत सापडलेली रहस्यमय पेंटिग आणि त्यावरील प्रतिकांनी ही कहाणी अधिक किचकट झाली आहे.
या हत्याकांडामागे केवळ प्रेमाची त्रिशंकू अवस्था होती का? की साहिलच्या डोक्यात आणखी काही वेगळं सुरू होतं. पोलिसांनी सांगितल्यामुळे मुस्कान नोव्हेंबर महिन्यापासून सौरभच्या हत्येचा प्लान करीत होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world