Rohit Sharma : रोहित शर्माचा इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


Rohit Sharma announces his retirement from Test cricket : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज पुढील महिन्यात सुरु होत आहे. त्यापूर्वी रोहित शर्मानं मोठा निर्णय घेत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानं इन्स्टाग्रामवरुन ही घोषणा केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधून रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार अशी चर्चा सुरु होती, त्यापूर्वी रोहितनं टेस्ट क्रिकेटला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रोहित शर्मानं मागील वर्षी टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर T20 वर्ल्ड कपमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्यानं आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता रोहित फक्त वन-डे क्रिकेटमध्येच टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. 


रोहित शर्माचा टेस्ट रेकॉर्ड

रोहित शर्माला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात टेस्ट टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण, उत्तरार्धात त्यानं टीममधील जागा निश्चित केली. तसंच विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडल्यानंतर त्याच्याकडं टेस्ट टीमचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं.

रोहितनं 67 टेस्टमध्ये 40.57 च्या सरासरीनं 4301 रन्स केले. त्यामध्ये 12 सेंच्युरी आणि 18 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 

( नक्की वाचा : IPL 2025 : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे मुंबई इंडियन्सची मॅच संकटात? वाचा काय आहे सत्य )
 

यापूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित शर्मानं टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं होतं. पण, भारतीय टीमनं तो सामना गमावला. रोहितच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज मायदेशात गमावली. तसंच ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारतीय टीम पराभूत झाली. 

Advertisement

या दोन्ही सीरिजमध्ये रोहित बॅटर म्हणून सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण, त्यापूर्वीच रोहितनं तातडीनं निवृत्ती जाहीर केली आहे. 

Topics mentioned in this article