India vs Bangladesh Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेल्या टेस्टचा आज (सोमवार, 30 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. या टेस्टचे दोन दिवस पाऊस आणि ओलं मैदान यामुळे वाया गेले. चौथ्या दिवशी बांगलादेशची पहिली इनिंग 233 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या भारतीय ओपनर्सनी दमदार बॅटिंग करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) या ओपनिंग जोडीनं पहिल्या 3 ओव्हर्समध्येच 51 रन केले. जो फक्त भारतच नाही तर टेस्ट क्रिकेटमधील कोणत्याही टीमनं पहिल्या 3 ओव्हर्समध्ये केलेले सर्वोच्च रन आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमनं 50 पेक्षा जास्त रन केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टेस्ट क्रिकेटमधील सर्वात फास्ट 50 रन
3.0 - भारत वि. बांगलादेश 2024
4.2 - इंग्लंड वि. वेस्टइंडीज 2024
4.2 - इंग्लंड वि. वेस्टइंडीज 2024
4.3 - इंग्लंड वि. दक्षिण अफ्रीका 1994
4.6 - इंग्लंड वि. श्रीलंका 2002
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 11 बॉलमध्ये 23 रन काढून आऊट झाला. रोहितनं या खेळीत 1 फोर आणि 3 सिक्स लगावले. रोहित आणि यशस्वी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 23 बॉलमध्ये 55 रनची पार्टनरशिप केली. या दोघांनी टेस्ट क्रिकेटमध्ये T20 स्टाईलनं बॅटिंग करत बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं.
रोहित आऊट झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीनंही फटकेबाजी सुरुच ठेवली. यशस्वीनं त्याची हाफ सेंच्युरी फक्त 31 बॉलमध्ये पूर्ण केली. तो 51 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 सिक्सह 72 रन काढून आऊट झाला.
( नक्की वाचा : IPL 2025 पूर्वी CSK ला मोठा हादरा, 'कामाचा माणूस' KKR मध्ये दाखल )
कानपूर टेस्टचे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे आता पहिल्या इनिंगमध्ये झटपट मोठी आघाडी घेऊन बांगलादेशला शेवटच्या दिवशी ऑल आऊट करुन मॅच जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.