
आयपीएल 2025 ची तयारी सर्वच टीमनं सुरु केली आहे. बीसीसीआयनं अद्याप रिटेंशन पॉलिसी जाहीर केलेली नाही. त्यापूर्वीच आगामी ऑक्शनपूर्वी सर्व टीमनं बांधणी सुरु केली आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) गौतम गंभीरचा उत्तराधिकारी म्हणून महेंद्रसिंह धोनीचा खास मित्र आणि चेन्नई सुपर किंग्सचा बॉलिंग कोच ड्वेन ब्राव्होची (Dwayne Bravo) नियुक्ती केली आहे. गंभीर गेल्या सिझनमध्ये केकेआरचा मेंटॉर होता. तो आता टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानं ही जागा रिक्त होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवृत्तीनंतर लगेच नियुक्ती
ड्वेन ब्राव्होनं T20 प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्लच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राव्होनं दुखापतीमुळे कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं निवृत्तीची घोषणा करताच काही तासांनीच कोलकाता नाईट रायडर्सनं त्याची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे.
Say hello to our new Mentor, DJ 'sir champion' Bravo! 💜
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 27, 2024
Welcome to the City of Champions! 🎶🏆 pic.twitter.com/Kq03t4J4ia
ब्राव्हो आणि CSK
ब्राव्होनं 2008 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याला चेन्नई सुपर किंग्सनं 2011 साली करारबद्ध केलं. तेव्हापासून तो सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू राहिलाय. ब्राव्होनं 161 आयपीएल मॅचमध्ये 183 विकेट्स घेतल्या. सीएसकेच्या अनेक संस्मरणीय विजयात ब्राव्होनं डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या बॉलिंगचा तसंच उपयुक्त बॅटिंगचा महत्त्वाचा वाटा होता.
( नक्की वाचा : 'विराट कोहलीनं RCB मध्ये येऊ दिलं नाही', व्हायरल पोस्टला ऋषभ पंतनं दिलं उत्तर )
चेन्नई सुपर किंग्सचा महान खेळाडू महेंद्रसिंह धोनीचा विश्वासू सहकारी अशी ब्राव्होची ओळख होती. आयपीएलमधून 2022 साली निवृत्त झाल्यानंतरही तो सीएसकेच्या मॅनेजमेंटचा सदस्य होता. तुषार देशपांडेसह सीएसकेच्या सर्व तरुण बॉलर्सच्या जडणघडणीचं श्रेयही ब्रॉव्होला दिलं जातं. सीएसकेसाठी अत्यंत 'कामाचा माणूस' असलेला ब्राव्हो केकेआरमध्ये दाखल झालाय. चेन्नई सुपर किंग्ससाठी आगामी ऑक्शनपूर्वी हा मोठा धक्का आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world