Kuldeep Yadav Engagement: भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने लखनौमध्ये एका कार्यक्रमात त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी साखरपुडा केला आहे. टीम इंडियाच्या चायनामन बॉलरच्या साखरपुड्याला अनेक स्टार क्रिकेटपटू सहभागी झाले होते. हा कार्यक्रम अत्यंत खासगी ठेवण्यात आला होता. कुलदीप नुकत्याच झालेल्या आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्यामध्ये त्यानं 14 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या. मात्र दिल्लीला नॉक आऊटमध्ये प्रवेश मिळाला नाही. दिल्लीची टीम पाचव्या क्रमांकावर राहिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे कुलदीपच्या होणारी पत्नी?
भारतासाठी 13 कसोटी सामने खेळलेल्या कुलदीप यादवची होणारी पत्नी वंशिका, कानपूरच्या श्याम नगरची रहिवासी असून ती एलआयसीमध्ये कार्यरत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वंशिका आणि कुलदीप बालपणीचे मित्र आहेत. त्यांच्या साखरपुड्याला रिंकू सिंसह अनेक भारतीय स्टार्स उपस्थित होते.
लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार
भारत क्रिकेट टीम लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण करणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ही टेस्ट सीरिज आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. कुलदीप या संघाचा भाग आहे. कोहली आणि रोहितच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची ही पहिली सीरिज असेल. या सीरिजसोबतच टीम इंडियाचा नवा कॅप्टन शुबमन गिलची परीक्षाही सुरू होईल.
( नक्की वाचा : IPL 2025 Final : साई सुदर्शन नाही तर सूर्यकुमारला मिळाला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार, काय आहे कारण? )
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेली टीम इंडिया
शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन आणि विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.