जाहिरात

IPL 2025 Final : साई सुदर्शन नाही तर सूर्यकुमारला मिळाला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार, काय आहे कारण?

IPL 2025 Final : साई सुदर्शन नाही तर सूर्यकुमारला मिळाला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार, काय आहे कारण?
Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सचा प्रमुख बॅटर सूर्यकुमार यादवला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
मुंबई:

Suryakumar Yadav PLAYER OF THE SERIES: आयपीएल 2025 चं सूप अखेर वाजलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) पंजाब किंग्जचा (PBKS) पराभव करत या सिझनचं विजेतेपद पटकावलं. आरसीबीचं हे पहिलंच विजेतेपद आहे. आरसीबी फॅन्सचं 18 वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. 

या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या  साई सुदर्शनला 'प्लेअर ऑफ द सिरीज'चा (Player of the Series) पुरस्कार मिळाला नाही, तर हंगामात सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवला या पुरस्काराने गौरवण्यात आले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

साई सुदर्शननं 15 मॅचमधील 15 इनिंगमध्ये 759 रन्स केले. तर सूर्यकुमार यादवनं 16 मॅचमध्ये 717 रन्स केले. साईनं सूर्यापेक्षा जास्त रन्स केले. पण, तरीही 'प्लेअर ऑफ द सिरीज'चा पुरस्कार सूर्यकुमार यादवला मिळाला. सहसा स्पर्धेच सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटरला  'प्लेअर ऑफ द सिरीज'चा पुरस्कार दिला जातो. पण, यंदा सर्वाधिक रन्स करणाऱ्याला नाही कर दुसऱ्या क्रमांकावरील सूर्यकुमारला हा पुरस्कार दिला गेला.

काय आहे कारण?

बहुतेक स्पर्धांमध्ये 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (POTT) चा निर्णय एका समितीद्वारे केला जातो, परंतु आयपीएलमध्ये 'एमव्हीपी' (MVP - Most Valuable Player) पुरस्काराचा निर्णय गुण-आधारित प्रणालीद्वारे (points-based system) ठरवला जातो. 

2012 पर्यंत POTT कडून हा पुरस्कार दिला जात असे. 2013 पासून MVP प्रणाली सुरु झाला. या सिझनमध्ये सूर्यकुमारनं MVP मध्ये 320.5 पॉईंट्स मिळवले. कर सुदर्शनने 311.0 पॉईंट्स मिळाले. या सिझनमध्ये अन्य कोणत्याही खेळाडूला 300 पेक्षा जास्त पॉईंट्स मिळाले नाहीत. यशस्वी जैस्वाल 273 पॉईंट्सह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 

( नक्की वाचा : IPL 2025 Final : Ee Sala Cup Namdu, कोहलीचं 'विराट' स्वप्न पूर्ण, RCB पहिल्यांदाच चॅम्पियन! )
 

कसे ठरतात पॉईंट्स?

या पॉईंट्सह प्रत्येक प्लेयरला सिक्सर मारल्यानंतर 3.5 पॉईंट्स मिळतात. तर टॉड बॉल आणि रन आऊट केल्यानंतर एक पॉईंट मिळतो. तर प्रत्येक फोर, कॅच आणि स्टंपिंगसाठी 2.5 पॉईंट्स दिले जातात. 

सूर्यकुमार यादव या पद्धतीनुसार 320.5 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर होता. तर साई सुदर्शन 311.0 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याच कारणामुळे साईच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार मिळाला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com