कोणतीही व्यक्ती विमानाचा प्रवास का करते? वेळेच्या बचतीसोबतच लग्झरी सुविधा मिळणे हा त्यासाठी उद्देश असतो. हा उद्देश पूर्ण होण्यासाठी प्रवासी एा सिटसाठी हजारो रुपये मोजतात. पण, विमानातील सीट देखील तुटलेलं (Air India Broken Seat) असेल तर... आपले हजारो रुपये पाण्यात गेले असंच तुम्हाला वाटेल. सामान्य नागरिकांना या प्रकारचे अनुभव अनेकदा आले असतील पण केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्य मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना देखील हा अनुभव आला. त्यांनी हा संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटले आहेत. एअर इंडियानं देखील या प्रकरणावर तातडीनं स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवराज सिंह यांनी सांगितलं की, ते एका कार्यक्रमासाठी एअर इंडियाच्या विमानानं भोपाळहून दिल्लीला जात होते. ते विमानात बसले तसं त्यांना तिथं तुटलेली आणि खचलेली सीट मिळाले. त्यांना त्या सिटवर बसण्यास खूप त्रास होत होता. शिवराजसिंह यांनी तातडीनं स्टाफला बोलावलं आणि सिट तुटलीच असेल तर ती देण्यात का आली? असा प्रश्न विचारला. शिवराज सिंह यांनी या संपूर्ण प्रसंगाची माहिती X या सोशल मीडिया नेटवर्कवरुन ट्विट करत दिली आहे.
स्टाफनं काय दिलं उत्तर?
शिवराज सिंह चौहान यांना स्टाफनं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार त्यांनी तुटलेल्या सीटबाबत मॅनेजमेंटला यापूर्वीच सुचना दिली होती. विमानात अशा अनेक सीट आहेत. त्या तुटलेल्या असून खराब आहेत. त्यांनी या सीटचे तिकीट विकू नका, असंही मॅनेजमेंटला सांगितलं होतं.
शिवराज सिंह यांनी त्याचं उत्तर ऐकलं. पण, या सीटचं काय करावं? असा प्रश्न होता. त्यांच्याकडं दुसऱ्या सीटचा पर्याय देखील नव्हता. त्यांना अन्य प्रवाशांनी त्यांची सीट ऑफर केली होती. त्यांना दुसऱ्या सिटवर बसवण्याचा खूप आग्रह देखील केला होता. पण, शिवराजसिंह यांनी अन्य कुणालाही त्रास न देता तुटक्या सिटवरच पूर्ण प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : जट यमला पगला दिवाना... शिवराज सिंह चौहान पत्नीसोबत जोरदार नाचले, कारणही खास! Video )
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की, एखादा प्रवासी विमान कंपनीला पूर्ण पैसे देत असेल तर त्याला चांगली सुविधा मिळायला हवी. टाटांकडे एअर इंडिया गेल्यानंतर त्यांची सेवा पूर्वीपेक्षा चांगली झाली असेल असं त्यांना वाटलं होतं. पण, तो त्यांचा भ्रम होता. प्रवाशांकडून पूर्ण पैसा वसूल केल्यानंतर खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे हे अनैतिक असून प्रवाशांची फसवणूक करणे आहे.
एअर इंडियाने मागितली माफी
एअर इंडियानं शिवराज सिंह चौहान यांच्या पोस्टला उत्तर दिलं असून त्यांची माफी मागितली आहे. तुम्ही निश्चिंत राहा कंपनीनं या प्रकरणाची दखल घेतली असून भविष्यात या प्रकारची घटना घडू नये यासाठी काळजी घेऊ असं आश्वासन दिलं आहे.