Vaibhav Suryavanshi Century in 32 Balls : वैभव सूर्यवंशीने दोहामध्ये आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मधील आपल्या पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातविरुद्ध ३१८ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ३२ चेंडूत तुफानी शतक ठोकले आणि या दरम्यान त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ९ षटकार आले. याआधी सूर्यवंशीने फक्त १७ चेंडूत तुफानी अर्धशतक पूर्ण केले होते. त्याआधी सलामी फलंदाज प्रियांश आर्य दुसऱ्या षटकात जलद सिंगल घेण्याच्या प्रयत्नात रनआउट झाला. त्याआधी इंडिया ए ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
वैभवने आक्रमक फलंदाजी करून दोहामध्ये धावांचा पाऊस पाडला. वैभव सूर्यवंशीने मोहम्मद जवादुल्लाहच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार लगावला. या षटकात एकूण २० धावा ठोकून वैभवने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. १४ वर्षांचा सुपरस्टार वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या विस्फोटक फलंदाजीने सगळ्यांची मने जिंकली. आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये या धडाकेबाज फलंदाजाने फक्त ३१ चेंडूत शतक ठोकले. याआधी त्याला ५० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी १७ चेंडू लागले होते. आपल्या खेळीत त्याने १५ षटकार आणि ११ चौकार लगावले.
नक्की वाचा >> बिहारमध्ये NDA चं डबल इंजिन सुसाट, 'ही' आहेत विजयामागची सर्वात महत्त्वाची कारणे
इथे पाहा वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ
इंडिया ए आणि यूएई यांच्यात १४ नोव्हेंबरला खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात होताच वैभवचा तुफानही सुरू झाला. त्याने मैदानाचा असा कोणताही कोपरा सोडला नाही, जिथे षटकार-चौकार लागले नाहीत. एका क्षणी असे वाटत होते की तो सहजपणे द्विशतक ठोकणार, पण १४४ धावा करून तो सीमारेषेवर झेलबाद झाला. वैभव सूर्यवंशीचे हे दुसरे टी-२० शतक आहे. याआधी त्याने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सलामी फलंदाजी करत गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक पूर्ण केले होते.
नक्की वाचा >> Bengal Tiger Video सर्वात खतरनाक वाघ रस्ता ओलांडत होता, दुचाकीस्वार थांबला अन् दोघांची नजर भिडली अन् पुढे..