Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची 35 बॉलमध्ये सेंच्युरी! मोडले इतके सारे रेकॉर्ड्स...

जाहिरात
Read Time: 2 mins
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीनं गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. (फोटो - @BCCI)
मुंबई:

IPL 2025 Vaibhav Suryavanshi  : आयपीएल 2025 च नाही तर आयपीएल स्पर्धेचा एकूण इतिहास लिहित असताना 28 एप्रिल 2025 हा दिवस कुणीही विसरणार नाही. त्या दिवशी  राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) या  14 वर्षांच्या बॅटरनं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujrat Titans) 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वैभवनं कोणते रेकॉर्ड मोडले?

वैभव आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान सेंच्युरी करणारा भारतीय बनला आहे. त्यानं गुजरात टायन्सविरुद्ध 35 बॉलमध्ये सेंच्युरी केली. यापूर्वी हा रेकॉर्ड टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युसूफ पठाणच्या (37 बॉल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) नावावर होता. 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वयात (14 वर्ष 32 दिवस) वयात सेंच्युरी करण्याचा विक्रमही वैभवच्या नावावर झालाय. यापूर्वी हा विक्रम मनिष पांडेच्या (19 वर्ष 253 दिवस) नावावर होता. 

वैभवनं T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात  (14 वर्ष 32 दिवस) सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड मोडला.त्यानं महाराष्ट्राच्या विजय झोलला (18 वर्ष 118 दिवस) मागे टाकले. विजयनं 2013 साली मुंबई विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा रेकॉर्ड केला होता. 

Advertisement

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : : 'वैभव सूर्यवंशी पुढच्या सिझनमध्ये खेळणार नाही...' वीरेंद्र सेहवागनं दिला गंभीर इशारा )

वैभवनं T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर केलाय. यापूर्वी हा रेकॉर्ड अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद नबीचा मुलगा हसन ईसाखिलच्या नावावर होता. हसननं 2022 साली (15 वर्ष 360 दिवस )  हाफ सेंच्युरी झळकाली होती.

वैभवनं या आयपीएल 2025 मध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी (17 बॉल) झळकावली. यापूर्वी हा रेकॉर्ड लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) निकोलस पूरनच्या नावावर (18 बॉल) होता. 

Advertisement

वैभव आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वयात हाफ सेंच्युरी झळकाली. त्यानं राजस्थान रॉयल्सच्या रियान परागचा (17 वर्ष 175 दिवस) रेकॉर्ड मोडला.

वैभवनं या इनिंगमध्ये 11 सिक्स लगावले. आयपीएलच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा भारतीय बॅटर मुरली विजयच्या रेकॉर्डची त्यानं बरोबरी केली. विजयनं 2011 साली हा रेकॉर्ड केला होता.

Advertisement

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं या मॅचमध्ये पहिल्या विकेटसाठी 166 रन्सची पार्टनरशिप केली. राजस्थान रॉयल्सकडून आजवर  कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च पार्टनरशिप आहे. या जोडीनं जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांच्या पार्टनरशिपचा (155 रन्स) रेकॉर्ड मोडला.