
Virender Sehwag Fires Warning To Vaibhav Suryavanshi : बिहारचा 14 वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीनं या आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलं. त्यानंतर तो सातत्यानं चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्सनं वैभवनं 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले होते. क्रिकेट विश्वातील उगवता स्टार असलेल्या वैभवबद्दल वीरेंद्र सेहवागनं एक मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला सेहवाग?
'सूर्यवंशीनं पुढची 20 वर्ष खेळण्याचा विचार केला पाहिजे,' असा सल्ला सेहवागनं 'क्रिकबझ' च्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. वैभव आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये फक्त 16 रन काढून आऊट झाला. त्यावर बोलताना सेहवाग म्हणाला की, 'पुढील 20 वर्ष आयपीएलमध्ये खेळण्याचं त्याचं ध्येय असेल. त्यानं विराट कोहलीचं उदाहरण समोर ठेवावं. त्यानं 19 व्या वर्षी पदार्पण केलं. तो सर्व 18 सिझन खेळला आहे.
तो (वैभव) या आयपीएलवरच खुश असेल. कमी वयात करोडपती झालो, कमी वयार पदार्पण केलं, पहिल्या बॉलवर सिक्स लगावला म्हणून खुश असेल तर कदाचित तो पुढच्या सिझनमध्ये दिसणार नाही, असा इशारा सेहवागनं दिला.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
सेहवाग पुढे म्हणाला की, 'एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर पुढं काहीही करु न शकलेले खेळाडू आपण पाहिले आहेत. वैभवनं विराट कोहलीसारखं व्हायला हवं. अंडर 19 वर्ल्ड कपमधून आयपीएलमध्ये आलेले बरेच खेळाडू आयपीएलमध्ये फ्लॉप झाले आहेत. त्यामध्ये उन्मुक्त चंदचा समावेश आहे. त्याला सतत खराब कामगिरी केल्यानं टीमनं बाहेरचा रस्ता दाखवला.'
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा (Lucknow Super Giants) सामना खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये वैभव सूर्यवंशीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संधी देण्याचा निर्णय राजस्थानच्या मॅनेजमेंटनं घेतला. त्यामुळे वैभवला पदार्पणाची संधी मिळाली.
वैभवनं 14 वर्ष 23 दिवस पूर्ण केल्यानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं.त्यानं आयपीएल कारकिर्दीमधील पहिल्याच बॉलवर सिक्सर लगावला. टीम इंडियाकडून खेळण्याचा अनुभव असलेला फास्ट बॉलर आवेश खानला त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स लगावला.
वैभव 20 बॉलमध्ये 34 रन्स काढून आऊट झाला. या खेळीत त्यानं 2 फोर आणि 3 सिक्स लगावले. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालबरोबर पहिल्या विकेटसाठी 85 रन्सची भागिदारी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world