जाहिरात

IND-U19 vs AUS-U19: आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात वैभव सूर्यवंशीने काय केलं? अंपायरसोबतच्या वादाचा पाहा Video

AUS-U19 vs IND-U19: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या युथ टेस्टमधील पहिल्या दिवशी जोरदार ड्रामा झाला.

IND-U19 vs AUS-U19: आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात वैभव सूर्यवंशीने काय केलं? अंपायरसोबतच्या वादाचा पाहा Video
Vaibhav Suryavanshi : अंपायरनं आऊट देताच वैभव सूर्यवंशी नाराज झाला.
मुंबई:

Vaibhav Suryavanshi ,2nd Youth Test at Mackay, AUS-U19 vs IND-U19: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या युथ टेस्टमधील पहिल्या दिवशी जोरदार ड्रामा झाला. आयपीएल स्टार आणि टीम इंडियाचं भविष्य मानल्या जाणाऱ्या वैभन सूर्यवंशीचं मैदानावरील वर्तन पहिल्या दिवशी चर्चेचा विषय ठरला. दुसरी युथ टेस्ट ऑस्ट्र्ेलियातील मकायमध्ये होत आहे. 

नेमकं काय घडलं?

वैभवनं त्याच्या इनिंगमध्ये सुरुवात चांगली केली. पण, त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. त्यानं 14 बॉलमध्ये 20 रन्स केले. त्याच्या खेळीत 2 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. पण, त्यानंतर अंपायरनं त्याला आऊट दिलं. त्यावेळी वैभव काही काळ क्रिजवर अंपायरकडं पाहात उभा होता. तो पॅव्हिलियनमध्ये परतानाही अंपायरशी बोलत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विकेट किपर अ‍ॅलेक्स ली यंगने वैभवचा कॅच घेतला. त्यावेळी हा बॉल बॅटला न लागता थायपॅडला  (Thigh Pad) लागून गेला आहे, अशी वैभवला खात्री होती. पण, अंपायरनी त्याला आऊट दिले होते. या निर्णयावर वैभव नाराज होता. 

टीम इंडियाला आघाडी

ऑस्ट्रेलियातील मकायमध्ये सुरु असलेल्या या चार दिवसांच्या युथ टेस्टमध्ये टीम इंडिया अंडर 19 टीमला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी मिळाली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलिया अंडर 19 टीम 135 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून हेनिल पटेल आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या, तर उधव मोहनला 2 विकेट्स मिळाल्या. 

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या इनिंगमध्ये अ‍ॅलेक्स ली यंगने सर्वाधिक रन्स केले. त्यानं 108 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 66 रन्स केले. त्याच्या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 135 पर्यंत मजल मारता आली. 

भारताच्या इनिंगची सुरुवात खराब झाली. वैभव 20 तर वेदांत त्रिवेदी 25 रन्स काढून आऊट झाले. कॅप्टन आयुष म्हात्रेहीही 4 रन्सवर परतला. पहिल्या दिवसाअखेर टीम इंडियानं 7 आऊट 144 रन्स केले. भारताकडं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 9 रन्सची आघाडी असून आपल्या आणखी 3 विकेट्स बाकी आहेत. 

( नक्की वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माला हटवणे कठीण, पण...; 'ती' 3 कारणे देत आगरकरनं फोडलं गुपित )
 

भारताकडे आघाडी

भारतीय अंडर 19 टीमने पहिली यूथ टेस्ट एक इनिंग आणि 58 रन्सनं जिंकली होती. त्या टेस्टमध्ये वैभवनं 86 बॉल्समध्ये 113 रन्स केले होते. वैभवनं त्या इनिंगमध्ये 9 फोर आणि 8 सिक्स लगावले होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com