मेडल हुकलं, पण भाव वाढला! विनेश फोगाटला करारबद्ध करण्यासाठी चढाओढ, इतक्या पटीनं वाढली फीस

Many Companies Want to Sign Agreement With Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यात विनेश फोगाटला अपयश आलं. पण, तिच्या लोकप्रियेतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vinesh Phogat
मुंबई:

Many Companies Want to Sign Agreement With Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यात विनेश फोगाटला अपयश आलं. पण, तिच्या लोकप्रियेतेमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनेशचा चेहरा देशवासियांना आता चांगलाच ओळखीचा झालाय. पॅरिसहून परतलेल्या विनेशसोबत करार करण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये चढाओढ आहे. या कंपनीकंडून विनेशला मोठी रक्कम ऑफ केली जात आहे. 

( )
 

15 कंपन्या रांगेत

मीडिया रिपोर्टनुसार विनेश फोगाटला करारबद्ध करण्यासाठी तब्बल 15 ब्रँड सध्या प्रयत्न करत आहेत. दागिने, शिक्षण, पॅकेज फूड, आरोग्य, पोषण आणि बँकिंग क्षेत्रातील बड्या कंपन्या विनेशनं त्यांच्या ब्रँडचं प्रमोशन करावं म्हणून प्रयत्न करत आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विनेश यापूर्वी एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी दरवर्षी 25 लाख रुपये घेत असे. ही किंमत आता 75 लाख ते 1 कोटीपर्यंत पोहोचली आहे. 

विनेश फोगाट सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाई करते. रिपोर्टनुसा ती पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एक इन्स्टाग्राम पोस्टसाठी साधारण 2 ते 3 लाख रुपये चार्ज करत होती. आता एका पोस्टची किंमत ही 10 ते 15 लाख इतकी झाली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : मायदेशी परतताच बदललं मन, विनेश फोगाटनं केली मोठी घोषणा )
 

विनेशनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करत फायनलपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झालीय. याबाबतच्या वृत्तानुसार विनेशला 5 ऑगस्टपर्यंत इन्स्टाग्रामवर 2.88 लाख जण फॉलो करत होते. सध्या तिचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

Topics mentioned in this article