Vinod Kambli Dance : 'चक दे इंडिया' गाण्यावर नाचला विनोद कांबळी, हॉस्पिटलमध्येही जोश कायम, Video

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या चर्चेत आहे. विनोदचा एक नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या चर्चेत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात विनोद सचिन तेंडुलकरसह दिसला होता. त्यावेळी विनोद कांबळीची अवस्था पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत सर्व क्रिकेट फॅन्समध्ये चर्चा सुरु होती. त्याचवेळी त्याला ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विनोदवर सध्या ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विनोदची तब्येत आता सुधारत आहे. त्याचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो 'चक दे इंडिया' गाण्यावर नाचतोय. विनोद हॉस्पिटलमधील कपड्यात असून त्याच्यासोबत एक महिला देखील आहे.

'चक दे इंडिया' हे गाणं वाजू लागताच विनोदला राहवत नाही. तो हॉस्पिटलमध्येच नाचू लागतो, असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विनोदसोबत त्या महिलेनं देखील ताल धरला आहे. 

विनोदला काय झालंय?

विनोद कांबळीची तब्येत अचानक ढासाळल्यानं त्याला 21 डिसेंबर रोजी ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं तो बेशुद्ध झाला होता, अशी माहिती त्याच्या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली होती. 

इन्फेक्शन आणि शरीराच्या काही भागांना वेदना जाणवत असल्यानं कांबळीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, काही चाचण्या घेतल्यानंतर त्याच्या रक्तात गुठळ्या झाल्याचं आढळून आलं होतं.

Advertisement

( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )

विनोद कांबळीची कारकिर्द

सध्या 52 वर्षांचा असलेल्या विनोद कांबळीची 1990 च्या दशकातील आक्रमक क्रिकेटपटू अशी ओळख होती. त्यानं टीम इंडियाकडून 17 टेस्टमध्ये 1084 रन काढले आहेत. 227 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. यामध्ये 4 सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. भारताकडून सलग दोन डबल सेंच्युरी करण्याचा विक्रमही कांबळीनं केला होता. 

( नक्की वाचा : )

त्याचबरोबर विनोद कांबळीनं 104 वन-डे मॅचमध्ये 2477 रन काढले. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. 
 

Topics mentioned in this article